येरूशलम : इस्त्रायलचे पंतप्रधान बेजामिन नित्यान्याहू यांनी मोदींच्या योग प्रसाराची तोंडभरून स्तुती केली. काल मोदींच्या सन्मार्थ दिलेल्या डिनरच्या वेळी झालेल्या पत्रकार परिषदेत नित्यान्याहू यांनी मोदी हे त्याच्यांसाठी योगाची प्रेरणा ठरल्याचं नमूद केल. याशिवाय भारत-इस्त्रायल संबंध आणि योगासनांची सांगडही घातली. तर दहशतवादाशी लढण्यासाठी दोन्ही देशांनी एकत्र येणं ही काळाची गरज असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अधोरेखित केलं.


तीन दिवसांच्या परदेश दौ-यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं इस्रायलमध्ये अभूतपूर्व स्वागत झालं. तेल अवीवमधल्या बेन गुरीअन विमानतळावर स्वतः इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नितन्याहूआपल्या संपूर्ण मंत्रिमंडळासह उपस्थित होते. यावेळी पंतप्रधान मोदींचं जंगी स्वागत करण्यात आलं.