नवी दिल्ली : यंदाच्या वर्षाचं शेवटचं चंद्र ग्रहण ३० नोव्हेंबर रोजी दिसणार आहे. दिवाळीच्या १६ दिवसांनंतर हा अखेरचा चंद्र ग्रहण नागरिकांना पाहता येणार आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे ग्रहण अमेरिकेसोबतच जगातील अनेक देशांमध्ये दिसणार आहे. परंतु भारतात हे ग्रहण दिसणार नाही. ३० नोव्हेंबर रोजी दुपारी १.०४ वाजता सुरू होवून दुपारी ३.१३ वाजता समाप्त होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२०२० वर्षात एकूण ६ ग्रहण लागले. त्यात २ सूर्यग्रहण आणि ४ चंद्रग्रहणाचा समावेश आहे. १० जानेवारी रोजी वर्षातील पहिलं चंद्र ग्रहण झालं. त्यानंतर ३० नोव्हेंबर २०२० रोजी यंदाच्या वर्षातील अखेरचे चंद्र ग्रहण दिसणार आहे. 


शिवाय यंदाच्या  वर्षाचा शेवटचा सुर्यग्रहण (Solar Eclipse) १४ डिसेंबर २०२०  रोजी दिसणार आहे. सूर्य आणि चंद्र ग्रहण मिळून आतापर्यंत ४ ग्रहण नागरिकांना पाहता आले आहेत, तर वर्षाचं शेवटचं ग्रहण डिसेंबरमध्ये दिसणार आहे.