मुंबई - खरतर सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. अशाच एक व्हिडिओ चिमुरडीचा मोठ्या प्रमाणात व्हायरल झालाय. एक लहान चिमुरडी टीव्ही पाहताना पाह्यला मिळते आणि तिच्यासोबत 12 फूट उंच अजगर (Paython) या व्हिडिओत दिसतोय. 



इन्स्टाग्रामवर LADbible या युजर्सने पोस्ट केलेला हा व्हिडिओ आतापर्यंत जवळपास 5 दशलक्ष वेळा पाहिला गेला आहे. या व्हिडिओमध्ये ही चिमुरडी मोठ्या मजेत टीव्हीवर काहीतरी पाहताना दिसते. तुम्ही सोफ्यावर तिच्या सभोवती पिवळा अजगर फिरतानाही पाहू शकता. ती चिमुरडी अजगराच्या भोवती अगदी आरामात बसलेली आहे. या चिमुरडीच्या तोंडावर थोडी सुद्धा भीती पाह्यला मिळत नाही. 


व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे सध्या सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले. काही लोकांना मुलीच्या सुरक्षेची चिंता वाटते. तर काहींना मात्र व्हिडिओ पाहिल्यानंतरही डोळ्यांवर विश्वास बसत नाही.