स्टॉकहोम : २०१८चा शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर झालाय. डॉ. डेनिस मुकवेगे आणि त्यांची सहकारी नादिया मुराद यांना संयुक्तरित्या यंदाचा नोबेल पुरस्कार जाहीर झालाय. युद्धप्रसंगी आणि सशस्त्र संघर्षादरम्यान लैंगिक शोषणाचा हत्यार म्हणून वापर करणे बंद व्हावे यासाठी प्रयत्न केल्याबद्दल या दोघांना शांततेच्या नोबेलने सन्मानित करण्यात येणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नॉर्वेच्या नोबेल समितीने मुक्वेगे आणि मुराद यांची निवड केली. यंदा या पुरस्कारासाठी २१६ लोक आणि ११५ संघटनांना नामांकन देण्यात आले होते. डिसेंबरमध्ये होणाऱ्या विशेष कार्यक्रमात या दोघांना सन्मानित केले जाणार आहे. 



यंदा जाहीर झालेल्या शांततेच्या नोबेलचे पुरस्कर्ते मुकवेगे यांनी युद्ध प्रसंगी लैंगिक शोषण झालेल्या पीडितांचे संरक्षण करण्यासाठी आपले जीवन समर्पित केलंय. त्यांची सहकारी नादिया मुराद यांनाही या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलंय. त्यांनी स्वतःवर झालेला आणि दुसऱ्यांवर झालेल्या शोषणाविरोधात लढा दिलाय.