फ्लोरिडा : अमेरिकेतील फ्लोरिडामध्ये बोइंग ७३७ हे प्रवासी विमान लॅंडिंग करताना नदीत कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या विमानात १४० लोक होते. परंतु सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे समोर आले आहे. बोइंग ७३७ हे विमान नवल एयर जॅक्शनविले येथील रनवे वरुन थेट सेंट जॉन्स नदीत कोसळले. शुक्रवारी मध्यरात्री ही घटना घडली. 




COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विमानात १४० लोकांपैकी १३३ प्रवासी आणि ७ क्रू मेंबर होते. विमान नदीन कोसळ्यानंतर क्रॅश झाले नाही त्यामुळे ते न बुडल्याने जिवितहानी टळली आहे. घटनास्थळी जेएसओ मरीन यूनिटला बोलवण्यात आले असून बचावकार्य सुरु करण्यात आले आहे. विमानातून बाहेर काढण्यात आलेल्या प्रवाशांना तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नसून सर्व प्रवासी सुुखरुप आहेत.