मुंबई : ईस्ट इंडिया कंपनी (East India Company) वर 1780 मध्ये म्हैसूरचे शासक हैदर अली आणि त्यांचे पुत्र टिपू सुलतान यांनी ऐतिहासिक विजय मिळवला. एका चित्रामध्ये हा भव्य विजय स्पष्टपणे साकारण्यात आला. ही सचित्र पेंटिंग बुधवारी सर्वोच्च किंमतीला विकण्यात आली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बुधवारी लंडनमध्ये हे चित्र 630,000 पाउंड (6.32 कोटी रुपये) इतक्या किमतीला विकलं गेलं. 


कोट्यवधींच्या घरात किंमत 
10 सप्टेंबर 1780 मध्ये द्वितीय अँग्लो- म्हैसूर युद्धातील 'द बॅटल ऑफ पोलिलूर' (The Battle of Pollilur) चं चित्र सोथबी लिलावात आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली. 


आपल्या विजयाचा जल्लोष साजरा करण्यासाठी टिपू सुलतान यांनी 1784 मध्ये सेरिंगपट्टममध्ये नव्यानं उभारण्यात आलेल्या दोलत बागेत 'पोलीलूरच्या लढाई'चं एक चित्र कमिशन केलं. 


जाणकारांकडून जाणून घ्या, या चित्रात आहे तरी काय? 
सोथबीचे अभ्यासक विलियम डेलरिम्पल यांनी सांगितल्यानुसार या चित्रात दहशत, अराजकता आणि युद्धातील हिंसा दाखवण्यात आली आहे. ही एक अद्वितीय कलाकृती आहे, असंही त्यांनी नमूद केलं. 


32 फूट लांबी असणारं चित्र 
सूत्रांच्या माहितीनुसार मुळ पोलीलूर युद्धाच्या चित्राच्या तीन प्रती आहेत. मुघल इतिहासकार गुलाम हुसैन खान यांच्या सांगण्यानुसार या चित्राची लांबी 32 फूट इतकी आहे. 10 मोठ्या कागजांवर हे चित्र पसरलं आहे. 


हे चित्र त्या क्षणावर आधारलं आहे, जेव्हा ईस्ट इंडिया कंपनीकडे असणाऱ्या दारुगोळ्याचा स्फोट होतो आणि ब्रिटीश चौक्या उध्वस्त होतात आणि तेव्हाच टिपू सुलतान आपल्या ताफ्यासह पुढे जात असतात तेव्हाचे हे क्षण इथं साकारण्यात आले.