तालिबानची भारताला धमकी, अफगाणिस्तानच्या मदतीसाठी आलात तर..
Taliban threaten India : अफगाणिस्तानची (Afghanistan) राजधानी काबूल काबीज करण्यासाठी पुढे सरसावणाऱ्या तालिबानने (Taliban) भारताला (India) धमकी दिली आहे.
काबूल : Taliban threaten India : अफगाणिस्तानची (Afghanistan) राजधानी काबूल काबीज करण्यासाठी पुढे सरसावणाऱ्या तालिबानने (Taliban) भारताला (India) धमकी दिली आहे. दहशतवादी संघटनेने म्हटले आहे की, जर भारतीय सैन्य अफगाणिस्तानात आले तर ते खपवून घेतले जाणार नाही. त्याचे वाईट परिणाम होतील. तालिबानच्या प्रवक्त्याने इतर देशांना परिस्थितीतून धडा घेण्याचा सल्ला देताना सांगितले की, जर भारताने आपले सैन्य पाठवण्याचा निर्णय घेतला तर ते योग्य होणार नाही. तथापि, प्रवक्त्याने भारताकडून अफगाणिस्तानला केलेल्या मदतीची प्रशंसा केली आहे.
तालिबानचा इशारा आणि भारताचे कौतुक
तालिबानचे प्रवक्ते मोहम्मद सुहेल शाहीन (Suhail Shaheen) यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, जर भारत सैन्यासह अफगाणिस्तानात आला आणि त्यांची येथे उपस्थिती असेल तर ते भारतासाठी चांगले होणार नाही. शाहीन पुढे म्हणाले, 'त्याने अफगाणिस्तानातील लष्कर आणि इतर देशांच्या उपस्थितीचे परिणाम पाहिले आहेत, त्यामुळे हे त्याच्यासाठी एकाद्या पुस्तकासारखे आहे'. तालिबानच्या प्रवक्त्याने भारताच्या मदतीचे कौतुक करत म्हटले की, नवी दिल्लीने अफगाणिस्तानला मदत केली आहे, हे आधीही सांगितले गेले आहे आणि त्याचे कौतुक आहे.
सुहेल शाहीन यांनी म्हटले आहे की, आम्ही अफगाणिस्तानच्या लोकांसाठी महत्वाचे प्रकल्प आणि लोकांच्या आर्थिक समृद्धीसाठी केलेल्या कामाचे कौतुक करतो. भारतीय शिष्टमंडळाला भेटण्याच्या प्रश्नावर शाहीन म्हणाले की, कोणतीही स्वतंत्र बैठक झालेली नाही, परंतु दोहा येथील बैठकीदरम्यान भारतीय शिष्टमंडळ उपस्थित होते. तालिबानच्या बाजूने दूतावास आणि मुत्सद्यांना कोणताही धोका नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आम्ही कोणत्याही दूतावास किंवा मुत्सद्याला लक्ष्य करत नाही, असे प्रवक्त्याने सांगितले. आम्ही आमच्या निवेदनात हे अनेक वेळा सांगितले आहे. ही आमची बांधिलकी आहे '.
निशान साहिब काढण्यावर 'हे' सांगितले
तालिबानच्या नेत्याने काही दिवसांपूर्वी पकतियाच्या गुरुद्वारामधून निशान साहिब काढल्याचा आरोपही फेटाळला. शाहीन म्हणाले की, शीख समाजानेच तो ध्वज काढला आहे. जेव्हा तालिबानचे सुरक्षा अधिकारी आले, तेव्हा लोकांनी सांगितले की जर कोणी त्यांना पाहिले तर त्यांना त्रास दिला जाईल. शाहीन सांगतात की तालिबान्यांचे मन वळवल्यानंतर ध्वज परत फडकवला गेला. त्याचवेळी शाहीनने दहशतवादी संघटनांशी पाकिस्तानचे संबंध निराधार असल्याचा आरोप केला आहे. ते म्हणतात की हे जमिनीच्या वास्तविकतेवर आधारित नाहीत, परंतु विशिष्ट धोरणे, आपल्याबद्दल राजकीय हेतूंवर आधारित आहेत.