`मे महिन्यात या दिवशी 750 फूट उंच त्सुनामी येणार आणि`... टाईम ट्रॅव्हरलचा खळबळजनक दावा
मे महिन्यात पृथ्वीवर अनेक संकटे येणार आहे. या टाईम ट्रॅव्हलरने तारखांसहित घडणाऱ्या घटनांचे भाकित केले आहे. विशेष म्हणजे देखील यांच्या तारख्या देखील सांगितल्या आहेत.
Time Traveler : सध्या एका टाईम ट्रॅव्हरलच्या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे, लवकरच जगात 750 फूट उंच त्सुनामी येणार आहे. यामुळे मोठे नुकसान होणार आहे. या टाईम ट्रॅव्हलरने ही त्सुनामी कधी येणार याची तारीख देखील सांगितली आहे. या टाईम ट्रॅव्हलरने आपण 2671 या वर्षातून आल्याचा दावा केला आहे. या टाईम ट्रॅव्हलरने यापूर्वी अनेक दावे केले आहेत.
या रहस्यमयी टाईम ट्रॅव्हरलचे Eno Alaric या नावाने @theradianttimetraveller हे असे टिकटॉकवर अकाऊंट आहे. या टाईम ट्रॅव्हरलचे 26 हजार पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. टिकटॉक व्हिडिओतून या टाईम ट्रॅव्हलरने खळबळजनक दावे केले आहेत.
2023 या वर्षात पृथ्वीवर येणारी संकटे आणि नैसर्गिक धोक्यांचे भाकित
या टाईम ट्रॅव्हलरने 2023 या वर्षात पृथ्वीवर येणारी संकटे आणि नैसर्गिक धोक्यांचे भाकित केले आहे. त्यातच त्याने 15 मे 2023 रोजी मोठी त्सुनामी येणार आहे. या त्सुनामीमुळे समुद्रात 750 फूट उंच अशा महाकाय लाटा उसळतील. रौद्र रुप धारण केलेल्या या लाटांच्या तडाख्यात शहर उद्धस्त होतील असा दावा या टाईम ट्रॅव्हलरने केला आहे.
कुठे येणार महाप्रलयकारी त्सुनामी ?
यूएस वेस्ट कोस्ट, प्रामुख्याने सॅन फ्रान्सिस्को येथे हा महाप्रलयकारी त्सुनामी येणार आहे. यात मोठी जीवीत आणि वित्त हानी होणार आहे. यात लाखो लोकांचा बळी जाणार आहे. तसेच यामुळे कोट्यावधीचे नुसकान होणार आहे. या महाप्रलयकारी त्सुनामी नंतर भयंकर महामारी येवू शकते अशी भिती देखील या टाईम ट्रॅव्हलरने व्यक्त केली आहे.
2023 पृथ्वीवर येणार अनेक संकटे
मे महिन्यात पृथ्वीवर अनेक संकटे येणार आहे. या टाईम ट्रॅव्हलरने तारखांसहित घडणाऱ्या घटनांचे भाकित केले आहे. मात्र, अनेकांनी या टाईम ट्रॅव्हलरचे दावे फेटाळले आहेत.
15 मे रोजी 750 फूट (228 मीटर) उंच त्सुनामी येणार आहे.
30 मे रोजी पृथ्वीवर एलियन हल्ला करणार. पृथ्वीवर हल्ला करण्याच्या तयारीत असलेल्या परग्रहावरील 150 हून अधिक UFOs दिसणार आहेत.
12 जून रोजी कॅलिफोर्नियातील सॅन अँड्रियास येथे शक्तीशाली भूकंप येणार. या भूकंपाची तीव्रता 9.5 रिश्टल स्केल इतकी असेल. भूकंपामुळे 5 मैल खोल आणि 1 मैल रुंद असे विवर तयार होईल. यामुळे टायटॅनोबोआसह अनेक प्रकारचे नामशेष झालेले प्राणी पुन्हा दिसतील. तसेच तब्बल 75 फूट लांबीचा महाकाय सापही दिसेल असा दावा केला आहे.
14 जून रोजी 12 लोकांना सूर्याच्या अफाट उर्जेतून टेलिपॅथी आणि टेलिपोर्टेशनमुळे महासत्ता प्राप्त होईल.
18 जून रोजी चुकून वर्महोलमध्ये गेल्याने 7 लोक आकाशातून खाली पडताना दिसतील.