पतीच्या मृत्यूनंतर 14 महिन्यांनी महिलेने दिला बाळाला जन्म
महिलेने पतीच्या मृत्यूनंतर 14 महिन्यांनी बाळाला जन्म दिला आहे.
मुंबई : एका महिलेने तिच्या पतीच्या मृत्यूनंतर बाळाला जन्म दिला आहे. आता तुम्ही म्हणाल यामध्ये काय नवीन...मात्र या महिलेने पतीच्या मृत्यूनंतर 14 महिन्यांनी बाळाला जन्म दिला आहे. आता तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटलं असेल...हो पण हे खरं आहे. अमेरिकेमध्ये राहणाऱ्या एका 40 वर्षीय महिलेने पतीच्या मृत्यूनंतर 14 महिन्यांनी बाळाला जन्म दिला आहे.
40 सारा शेलेनबर्गर हिचा पती स्कॉट याचं गेल्यावर्षी फेब्रुवारीमध्ये हार्ट अटॅकमुळे निधन झालं होतं. आणि त्यानंतर आता मे महिन्यात बाळाला जन्म दिला आहे. मिररच्या रिपोर्टनुसार, अमेरिकेतील ओक्लाहोमा सिटीत राहणारी सारा शेलेनबर्गर आता 3 मे रोजी तिचा मुलगा हेस याला जन्म दिला आहे.
सारा शेलेनबर्गर सांगते, 'आम्हाला दोघांना तीन मुलं हवी होती आणि आम्ही स्वतःचे कुटुंबासाठी फार उत्सुक होतो. आम्ही लग्नानंतर लवकरच मुलासाठी प्रयत्न करण्यास सुरवात केली. मात्र अनेक प्रयत्नानंतर मी गरोदर राहू शकत नव्हते. यानंतर आम्ही डॉक्टरांशी संपर्क साधला आणि पालक होण्यासाठी आयव्हीएफ हा एकमेव मार्ग असल्याचं सांगितलं."
सारा शेलेनबर्गर म्हणतात, "डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार स्कॉट आणि मी बार्बाडोस फर्टिलिटी क्लिनिकमध्ये गर्भ सुरक्षित केला. मात्र काही दिवसांनी स्कॉटचा मृत्यू झाला. मी त्याच्या मुलास जन्म द्यावा अशी त्याची नेहमी इच्छा होती, म्हणून गेल्या वर्षी मी आयव्हीएफद्वारे आई होण्याचा विचार केला आणि ऑगस्टमध्ये मी गरोदर राहिले. अखेर मी आमच्या बाळाला जन्म दिला आहे."
सारा सांगते, "महाविद्यालयात शिकत असताना आम्ही प्रथम भेटलो. स्कॉटने फेसबुकच्या माध्यमातून माझ्याशी संपर्क साधला. तेव्हा आम्ही एकमेकांना डेट करण्यास सुरवात केली. त्यानंतर आम्ही सप्टेंबर 2018 मध्ये लग्न केलं.