मलेशिया : कधीकधी अशा घटना अचानक घडतात जेव्हा आपल्याला काय करावं आणि काय नाही हे समजत नाही. नेमकी अशीच परिस्थिती एका महिलेसोबत घडली आहे. या महिलेने रेस्टॉरंटच्या वॉशरूममध्ये अचानक मुलाला जन्म दिला. आणि धक्कादायक बाब म्हणजे त्या महिलेला ती गर्भवती असल्याचंही माहित नव्हतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

द मिरर मधील एका वृत्तानुसार, मलेशियातील सेलांगोर शहरातील एका रेस्टॉरंटमध्ये एका महिलेने वॉशरूममध्ये प्रीमॅच्युअर बाळाला जन्म दिला. . वास्तविक, ती महिला जेवणासाठी रेस्टॉरंटमध्ये गेली होती. दुपारच्या जेवणानंतर, ती वॉशरूममध्ये गेली. जिथे तिला प्रसूती वेदना होऊ लागल्या. सर्व काही इतक्या लवकर घडलं की त्या महिलेला काहीच समजलं नाही. ती महिला काही करण्यापूर्वीच तिचे मूल कमोडमध्ये पडलं.


महिलेचे रडणं ऐकून रेस्टॉरंटच्या कर्मचाऱ्यांनी शहरातील अग्निशमन आणि बचाव विभागाच्या आपत्कालीन सेवांना बोलावलं. अग्निशमन आणि बचाव विभागाच्या कर्मचारी रेस्टॉरंटमध्ये पोहोचले आणि बाथरूमचा दरवाजा तोडून कमोडमध्ये पडलेला गर्भाला वाचवण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना त्यात अपयश आलं. पॅरामेडिक्सने मुलाला जागीच मृत घोषित केले. तर त्या महिलेला तंजुंग करंग रुग्णालयात उपचारांसाठी पाठवण्यात आलं.


सेलांगोर अग्निशमन विभागाचे संचालक नोरजम खामिस यांनी सांगितलं की, ती महिला गर्भवती असल्याचं तिला माहीत नव्हतं. अग्निशामक आणि बचाव पथकाला शौचालयाचा फ्लश तोडून गर्भ काढण्यासाठी 10 मिनिटं लागली, त्या दरम्यान गर्भाला आपला जीव गमवावा लागला.


या घटनेने त्या महिलेलाही आश्चर्य वाटले, कारण ती गर्भवती असल्याचे तिला माहित नव्हतं.