जगातील सर्वात रहस्यमयी समुद्र, जिथे लाटांसोबत वाहून येतात भितीदायक बाहुल्या
आम्ही ज्या समुद्राबद्दल सांगतो तिथे लाटांसोबत वाहून खूप भीतीदायक गोष्ट समोर येते.
मुंबई : समुद्रकिनाऱ्यावर तुम्हाला शंख, शिंपले इतकंच नाही तर अनेकदा मौल्यवान वस्तू सापडतात. अनेकदा या गोष्टी ज्या समुद्राच्या लाटांमधून किनाऱ्यावर येतात. पण असं प्रत्येक किनाऱ्यावर हेच घडतंच असं नाही. कारण आम्ही ज्या समुद्राबद्दल सांगतो तिथे लाटांसोबत वाहून खूप भीतीदायक गोष्ट समोर येते.
आम्ही अमेरिकेतील एका समुद्रकिनाऱ्याबद्दल बोलतोय. या समुद्रातून कोणतीही मौल्यवान वस्तू बाहेर येत नाही तर भयानक बाहुल्या किनाऱ्यावर येतात.
दोन वर्षांपूर्वी अमेरिकेतील टेक्सासमध्ये समुद्रकिनाऱ्यांवर अत्यंत रहस्यमय बाहुल्या वाहून आल्या आहेत. युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सास मरीन सायन्स इन्स्टिट्यूटला या घटनेची माहिती मिळाल्यावर त्यांनी यावर संशोधन केलं. त्यांनी या संशोधनाला मिशन-अरनास रिझर्व्ह असं नाव दिलं. मिशन-अरनास रिझर्व्हच्या संशोधकांना 64 किलोमीटर अंतरावर असलेल्या समुद्रकिनाऱ्यावर डझनभर बाहुल्या सापडल्या.
त्यानंतर मिशन-अरनास रिझर्व्हच्या संशोधकांच्या टीममधील एका सदस्याने सांगितलं की, या बाहुल्या खूप भितीदायक आणि रहस्यमयी दिसतात. या भितीदायक बाहुलीच्या डोळ्यातून विचित्र बार्नेकल्स येत राहतात. बार्नेकल्स हे आर्थ्रोपॉडचा एक प्रकार आहेत, जे समुद्रात राहतात.
मिशन-अरनास रिझर्व्हचे संचालक जेस टनेल म्हणतात की, ज्या बाहुल्यांच्या डोक्यावर केस नसतात त्या सर्वात विचित्र आणि भयानक दिसतात. इथे आम्ही वैज्ञानिक काम करत आहोत. पण या बाहुलीचा आमच्यासाठी एक फायदा आहे. समुद्रकिनाऱ्यावर सापडलेली आणि केस नसलेल्या बाहुलीचे डोळे पाहून भिती वाटते.
दरम्यान या बाहुल्या कुठून येतात हा प्रश्न अजूनही कायम आहे. या समुद्रकिनाऱ्यावर सापडलेल्या बाहुल्यांचं प्रकरण खूपच अनोखं आहे.