मुंबई : जगातील सर्वात लहान वजनाची मुलगी अखेर उपचारानंतर घरी गेली आहे. जेव्हा एक नवजात बाळ जन्म घेतं तेव्हा त्याचं वजन जवळपास 2 ते 3 किलो असतं.  पण या चिमुकलीचं वजन फक्त  212 ग्रॅम होतं. या चिमुकलीचा जन्म पाचव्या  महिन्यातचं झाला. त्यामुळे तिच्या  शरीराचा विकास झाला नव्हता. तिचं वजन एका सफरचंदा एवढं होतं, पण आता उपचारानंतर चिमुकलीची प्रकृती स्थिर आहे. एका रिपोर्टनुसार सिंगापूरच्या नॅशनल यूनिव्हर्सिटीमध्ये 9 जून 2020 साली चिमुकलीचा जन्म झाला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जन्म झाला तेव्हा मुलीचा वजन फक्त 212 ग्रॅम असून उंची 24 सेंटीमीटर होती. तिचे फुफ्फुस देखील व्यवस्थित विकसित होत नव्हते आणि तिला व्हेंटिलेटरशिवाय श्वास घेता येत नव्हता. याशिवाय तिची त्वचाही खूप नाजूक होती. जन्माच्या वेळी, मुलीचे वजन एका सफरचंदाइतके होते, जे पाहून डॉक्टर आणि नर्सही आश्चर्यचकित झाल्या.



जेव्हा मुलीला अतिदक्षता विभागात (आयसीयू) आणण्यात आले तेव्हा डॉ. झांग सुहेचा यांच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. ते म्हणाले की, माझ्या 22 वर्षांच्या कारकिर्दीत मी इतकं लहान नवजात बाळ कधीही पाहिले नाही, ज्यांचे वजन इतके कमी आहे.  जन्मानंतर, क्वेक यू झुआन 13 महिने रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात राहिली आणि आठवड्यांसाठी तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले.


4 महिने आधी जन्म घेतलेल्या चिमुकलीचे प्राण वाचविण्यासाठी डॉक्टरांनी मोठी मेहनत केली. 9 जुलै रोजी जेव्हा तिला डिसचार्ज देण्यात आला तेव्हा तिचं वजन 6.3 किलो ग्रॅम होतं. डॉक्टरांना तिचे प्राण वाचविण्यात यश मिळालं आहे. त्याचप्रमाणे  क्वेक यू जुआनच्या उपचारासाठी तिच्या आई-वडिलांनी क्राऊड फडिंगच्या माध्यमातून 1.9 पाउंड जमा केले. 


1.9 पाउंड म्हणजे जवळपास 1 कोटी 95 लाख रूपये. यामधील 1लाख पाउंड म्हणजे 1 कोटी 3 लाख रूपये तिच्या उपचारासाठी खर्च झाले. तिच्या आई-वडिलांनी शिल्लक असलेले पैसे तिच्या भविष्याच्या उपचारासाठी ठेवले आहेत.