Scientists found yellow brick road at Pacific Ocean: अथांग प्रशांत महासागर(Pacific Ocean) हा अनेक रहस्यांनी भरलेला आहे. या समुद्राच्या तळाशी काय आहे याचा वैज्ञानिक शोध घेत आहेत. संशोधनादरम्यान प्रशांत महासागरच्या तळाशी वैज्ञानिकांना  रहस्यमयी पिवळा रस्ता आढला आहे. हा रस्ता पेव्हर ब्लॉकने बांधकाम केल्यासारखा दिसत आहे. समुद्राच्या तळाशी दिसलेला हा रस्ता पाहून वैज्ञानिक हैराण झाले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'सायंटिस्ट अलर्ट' या  सायन्स जर्नलमध्ये या संशोधनाबद्दल उल्लेख करण्यात आला आहे. हवाई बेटांच्या उत्तरेकडील समुद्रीतटाजवळील खोल समुद्रात वैज्ञिकांना संशोधन सुरु असताना हा पिवळा रस्ता सापडला आहे. हा रस्ता समुद्राच्या 3000 मीटर पेक्षा जास्त खोलवर आहे. हा परिसर संरक्षित समुद्र क्षेत्राअंतर्गत येतो. येथे सातत्याने वैज्ञानिकांते संशोधन सुरु असते.  हजारो वर्षांपूर्वी येथे एक बेट होते. कालातंराने हे बेट समुद्रात बुडाले. हा पिवळा रस्ता या बेटावरीलच असल्याचा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे. या संपूर्ण परिसरातील क्षेत्रात 3 टक्के जास्त संशोधन केले आहे.


अटलांटिक समुद्राच्या तळाशी आढळली होती गूढ छिद्रे


अमेरिकन वैज्ञानिकांना संशोधनादरम्यान अटलांटिक समुद्रात पृष्ठभागापासून 2.7 किलोमीटर खोलीवर समुद्रतळाशी अज्ञात आणि रहस्यमय अशी छिद्रे आढळून आली होती.  ही अजब आणि रहस्यमयी छिद्रे पाहून वैज्ञानिकही शॉक झाले. अमेरिकेच्या नॅशनल ओशनिक अँड अ‍ॅटमॉस्फिरिक अ‍ॅडमिनिस्ट्रेशनने (नोआ) आपल्या अधिकृत फेसबुक पेजवरून या छिद्रांची छायाचित्रे शेअर केली होती. अमेरिकेच्या नॅशनल ओशनिक अँड अ‍ॅटमॉस्फिरिक अ‍ॅडमिनिस्ट्रेशनने (नोआ) आपल्या अधिकृत फेसबुक पेजवरून या छिद्रांची छायाचित्रे शेअर केली होती. ही छिद्रे कशाची आहेत याची माहिती जगाकडे मागितली होती. यावर लोकांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या होत्या.  ही छिद्र एलियन्सनी बनवली असावीत अशा प्रकारच्या कमेंट्स युजर्सनी केल्या आहेत.