लंडन : इंग्लंडच्या पंतप्रधान थेरेसा मे यांच्या हत्येचा कट सुरक्षा एजन्सींनी उधळून लावला आहे. या प्रकरणात 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे.


12 महिन्यात 9 कट उधळले


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अटक करण्यात आलेले दोन्ही आरोपी अत्यंत तरूण असून, त्यपैकी नईमूर जकारिया रहमान हा 20 तर, आकिब इमरान हा 20 वर्षांचा आहे. एका वृत्तसंस्थेने (रॉयटर्स) दिलेल्या वृत्तानुसार, थेरेसा मे यांना जीवे मारण्याकरता एम्प्रोवाइज्ड एक्सप्लोसिव्ह डिवाइसच्या (IED)माध्यमातून 10, डाऊनिंग स्ट्रीट (इंग्लंडच्या पंतप्रदानांचे निवासस्थान) वर फिदाईन हल्ला करण्याचा कट होता. दरम्यान, थेरेसा मे यांच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 12 महिन्यांमध्ये मे यांना मारण्याचा कट 9 वेळा हानून पाढण्यात गुप्तचर संस्थांना यश आले आहे.


प्रदीर्घ काळापासून थेरेसा मे मारेकऱ्यांच्या रडारवर


स्काय न्यूजने, दिलेल्या वृत्तानुसार, प्रदीर्घ काळापासून थेरेसा मे या दहशतवाद्यांच्या रडारवर राहिल्या आहेत. त्यासाठी अनेक वेळा कटही करण्यात आला. पण, मारेकऱ्यांचा हा कट सुरक्षा यंत्रणांच्या कडक सतर्कतेमुळे उधळला गेला आहे. थेरेसा मे यांची हत्या करून देशात अराजकता माजविण्याचा प्रयत्न करायचा, अशी मारेकऱ्यांची योजना असल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे.


आरोपींना कोर्टासमोर हजर केले जाणार


दरम्यान, थेरेसा मे यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींना वेस्टमि्स्टर मॅजिस्ट्रेट कोर्टासमोर उभे केले जाणार आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, या प्रकरणी पोलिसांनी आणखी काही लोकांना गेल्या काही आठवड्यात ताब्यात घेतले आहे.