नवी दिल्ली : जगातील प्रत्येक देशात आपले काही वेगळे कायदे असतात. यामध्ये काही कायदे विचित्र असतात. असेच पाकिस्तानातही काही विचित्र कायदे आहेत. या कायद्यांमुळे पाकिस्तानवर टीका देखील होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तीन प्रकारचे कायदे
पाकिस्तानात तीन प्रकारचे कायदे लागू असतात. ज्यामध्ये पाकिस्तान पीनल कोड, शरिया कायदा आणि जिरगा कायदा होय. जिरगा कायदा अदिवासी परिसरातील लोकांसाठी लागू आहे. यामध्ये विचित्र नियम आहेत. 


शिक्षण शुल्कावर टॅक्स
पाकिस्तानातील साक्षरतेचे प्रमाण कमी आहे. साक्षरतेला प्रोत्साहन देण्यासाठी कोणतेही पावलं उचलंली जात नाही. पाकिस्तानात एखाद्या विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा खर्च 2 लाखाहून जास्त झाल्यास त्याला 5 टक्के टॅक्स द्यावा लागतो. त्यामुळे विद्यार्थी कमी शिक्षण घेतात.


इस्त्राइलला देश मानत नाही
अनेक रिपोर्टमध्ये असे म्हटले गेले की, पाकिस्तान आपल्या नागरिकांना इस्त्राइलला जाण्याची परवानगी देत नाही. कारण पाकिस्तानी सरकार इस्त्राइलला देश मानत नाही. त्यामुळे नागरिकांना इस्त्राइल जाण्याचा विजा मिळत नाही.


गर्लफ्रेंड असल्यास दंड
पाकिस्तानच्या Hudood Ordinance अनुसार, तुम्ही पाश्चिमात्त्य देशांप्रमाणे तरुणी/महिलेशी गर्लफ्रेंडप्रमाणे नाते ठेऊ शकत नाही. सरकार लग्नाशिवाय कोणत्याही पुरूषाला महिलेसोबत राहण्याचे स्वातंत्र देत नाही. म्हणजेच तुम्हाला लग्न करणे आवश्यक आहे. जर व्यक्ती आपल्या गर्लफ्रेंड सोबत राहताना आढळल्यास सरकार त्या व्यक्तीला तुरूंगात डांबते. 


काही वर्षापूर्वी सिंध प्रांतात एक विचित्र विधेयकाचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. त्यानुसार 18 वर्षाच्या व्यक्तींना लग्न करणे अनिवार्य होते. याशिवाय हा कायदा मोडल्यास दंड करण्यात येणार होता.


इंग्रजीत ट्रान्सलेशन करण्यास मनाई
संपूर्ण जगात इंग्रजी भाषा बोलली जाते. परंतु पाकिस्तानात काही अरेबिक शब्दांना इंग्रजीत ट्रान्सलेशन करण्यास मनाई आहे. जसे की, मशिद(मस्जिद), अल्लाह, रुसूल, नबी इत्यादी


मीम शेअर करण्यास मनाई
पाकिस्तानात सोशल मीडियावर कोणाचीही गंमत करण्यासाठी तयार करण्यात येणारे मीम्स शेअर करण्यास मनाई आहे. असे केल्यास तुम्हाला दंड होऊ शकतो.


बाजारात खाण्यास मनाई
पाकिस्तानात रमजानच्या दरम्यान, कोणत्याही नागरिकाला बाजारात काहीही खाण्यास मनाई असते. या दिवसांमध्ये सार्वजनिक ठिकाणी किंवा स्ट्रीट फूड खाने महाग पडू शकते.