Viral News : दबक्या पावलानं आला आणि... चोराला घरात असं काय दिसलं की क्षणात तो चोरी करायलाच विसरला?
दर दुसऱ्या दिवशी अमुक एका ठिकाणी चोरी झाली, तमुक एका ठिकाणी दरोडा पडला अशा अनेक घटना घडतात. या सर्व घटनांमध्ये सध्या एक अशी चोरी चर्चेचा विषय ठरत आहे जिथं चोर चक्क चोरीच करायला विसरला. खरं वाटत नाहीय? पण, प्रत्यक्षात तसं घडलंय.
Viral News : दर दुसऱ्या दिवशी अमुक एका ठिकाणी चोरी झाली, तमुक एका ठिकाणी दरोडा पडला अशा अनेक घटना घडतात. या सर्व घटनांमध्ये सध्या एक अशी चोरी चर्चेचा विषय ठरत आहे जिथं चोर चक्क चोरीच करायला विसरला. खरं वाटत नाहीय? पण, प्रत्यक्षात तसं घडलंय.
एका विचित्र घटनेमध्ये कथिक स्वरुपात चोर चोरी करण्यासाठी घरात आला. पण, फ्लॅटमध्ये येताच तो नेमका किथं कशासाठी आला आहे हेच विसरला आणि हे सर्व घडलं एका पुस्तकामुळं. एनबीली 15 च्या वृत्तानुसार 38 वर्षी अज्ञात चोरानं रोममधील प्रेती इथं बाल्कनीच्या मदतीनं एका फ्लॅटमध्ये प्रवेश केला.
दबक्या पावलांनी तो चोरी करण्यासाठी तिथं पोहोचला खरा. पण, बेडसाईड टेबलवर त्याला इलियडसंदर्भातील एक पुस्तक दिसलं आणि एका अर्थी याच पुस्तकानं त्याचा घात केला. चोर घरात घुसला तेव्हा त्या घराचा मालकही तिथं होता. त्या 71 वर्षीय इसमानं या चोराचा सामना केला आणि...
पुस्तकप्रेमी चोर?
चोराशी दोन हात करूनही घरमालकाच्या कचाट्यातून त्यानं पळ काढला आणि बाल्कनीतूनच तो पसार झाला पण, या घटनेनंतर लगेचच पोलिसांना त्यासंदर्भातील माहिती मिळताच त्यांनी त्याला ताब्यात घेतलं. दरम्यान, ज्या पुस्तकानं चोराचं लक्ष वेधलं होतं ते होतं जियोवन्नी नुचीचं ''द गॉड्स अॅट सिक्स ओ'क्लॉक''.
आश्चर्याची बाब म्हणजे ज्यावेळी या पुस्तकाच्या लेखकापर्यंत ही बातमी पोहोचली तेव्हा आपल्या पुस्तकानं एखाद्या व्यक्तीचं इतकं लक्ष वेधत मुख्य हेतूपासून विचलित केलं, हे जाणून त्यांना प्रचंड आनंद झाला. इतकंच नव्हे तर त्यांनी या चोराला आपल्या पुस्तकाची प्रत देण्याची इच्छाही व्यक्त केली.
हेसुद्धा वाचा : बापरे! चोरट्यांनी हातमागावरूनच लंपास केल्या लाखोंच्या पैठणी; किंमत पाहून पायाखालची जमीन सरकेल
आता चोराकडून मात्र एक वेगळीच माहिती समोर येत आहे. पोलिसांनी त्याच्या दाव्यावरून दिलेल्या माहितीनुसार हा चोर कथित स्वरुपात त्याचाच एका मित्राला भेटण्यासाठी या इमारतीच्या बाल्कनीतून आला होता, आपल्या नजरेत ते पुस्तक आलं आणि आपण ते वाचण्यास सुरुवात केली आणि साऱ्याचाच विसर पडला असं तो म्हणाला. दरम्यान या चोराकडे मिळालेल्या एका बॅगेतून महागडे कपडे आणि इतर ऐवज जप्त करण्यात आला. प्राथमिक स्वरुपातील माहितीनुसार त्यानं याआधी चोरी केलेल्या ठिकाणहून या गोष्टी चोरल्याचं म्हटलं जात आहे.