ब्राझील : एखादे व्यसन व्यक्तीला काय करायला लावील, याचा तुम्हाला अंदाजही येणार नाही. नशेसाठी एखादी व्यक्ती काय करेल याचे एक भयानक उदाहरण ब्राझीलमध्ये (Brazil) समोर आले आहे. येथील एका आईने स्वतःची मुले ड्रग्‍ससाठी (Drugs) विकली, जेणेकरून तिला ड्रग्‍स (Drugs) खरेदी करण्यासाठी पैसे मिळतील. रिओ डी जानेरोमधील साओ पेड्रो दा एल्दिया येथील मारिल्जा मेडीरोस दा कॉन्सेकाओ या महिलेला पोलिसांनी (Police) मंगळवारी अटक केली.


दीड महिन्याच्या मुलीलाही सोडले नाही


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या महिलेने आपली दीड महिन्याची मुलगी रेजिओ डॉस लागोस परिसरातील एका कुटुंबाला गेल्या वर्षी एप्रिलमध्ये फक्त £ 27.60 (2,850 रुपये) मध्ये दिली होती. अटकेनंतर आईने अधिकाऱ्यांना सांगितले की, तिने आपल्या मुलीच्या बदल्यात तिच्याकडून ड्रग्‍स (Drugs)घेतली होती. त्यामुळे आता पोलीस तपास करत आहेत की या महिलेने आपली इतर 7 मुलेही विकली आहेत का, कारण पोलिसांना आतापर्यंत महिलेच्या फक्त एका मुलाबद्दल माहिती मिळाली आहे, जी तिच्या वडिलांसोबत राहत होती.


आता मुलगी बालसुधारगृहात  


पोलीस प्रमुख मिल्टन सिक्वेरा जूनियर म्हणाले, 'दीड महिन्याचे बाळ गेल्या वर्षीच बालसुधारगृहात देण्यात आले. महिलेला आणखी 10 मुले आहेत, त्यापैकी फक्त एक मुलगी तिच्यासोबत होती आणि दुसरे मूल तिच्या वडिलांसोबत आहे. आता आम्ही उर्वरित मुलांनाही शोधत आहोत आणि तिने त्यांनाही विकले आहे का ते शोधून काढायचे आहे.


या प्रकरणात, 42 वर्षीय एलिझेनेला दा सिल्वा पचेको हिला कथितपणे मुलाला विकत घेतले, तिला शिक्षा सुनावण्यात आली आहे. न्यायाधीशांच्या मते, तिला 6 महिने सामुदायिक सेवा करावी लागेल. याशिवाय, तिला स्थानिक चॅरिटीला किमान 3 महिन्यांचे वेतन देण्यास सांगितले जाईल. हे दान चॅरिटी मुलांना शिक्षण देण्यास मदत करते.