Viral Video : सोशल मीडियावर कोणताही मुद्दा इतका चर्चेत येतो की पुढे जाऊन या मुद्द्याकडे माध्यमांच्याही नजरा वळतात. सध्या भारतामध्ये सोशल मीडियावर एकच मुद्दा लक्ष वेधत आहे तो म्हणजे चांद्रयान आणि त्या चांद्रयानानं (Chandrayaan 3) पाठवलेले काही फोटो आणि व्हिडीओ. अवकाशात नेमकं काय सुरुये हे इथं पृथ्वीवर असणारे तुम्हीआम्ही अगदी सहजपणे पाहू शकत आहोत. याच अवकाशातून आणखी एक अद्वितीय दृश्य पृथ्वीपर्यंत पोहोचलं आहे. हे दृश्य सध्या नेटकरी वारंवार पाहत आहेत. कारण, या अशा घटना वारंवार पाहायला मिळत नाहीत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हे दृश्य आहे अवकाशातून टीपलेल्या एका घोंगावणाऱ्या सक्रीय चक्रीवादळाचं. बीबीसी या वृत्तसंस्थेनं सोशल मीडियाच्या माध्यमातून अमेरिकेतील फ्लोरिडा प्रांतात आलेल्या इडलिया या चक्रीवादळाचे सॅटेलाईटनं टीपलेले काही फोटो अनेकांच्याच भुवया उंचावत आहेत. पृथ्वीच्या पृष्ठावर ही वादळं नेमकी कशी दिसतात याची अवघ्या काही सेकंदांची झलक पाहताना सर्वजण भारावत आहेत. वर्तुळाकारात वाहणारे वारे आणि त्याचप्रमाणे घोंगावणारे ढग, मधूनच होणारे स्फोट आणि विजांचा चमचमाट हे सर्वकाही या व्हिडीओमध्ये पाहता येत आहे. व्यवस्थित पाहिलं असता वादळाची तीव्रता अवकाशातून कशी दिसतेय हेच इथं स्पष्ट होत आहे. 


विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या उपलब्धतेमुळं असाध्य गोष्टी पाहण्याची संधीही आपल्याला मिळतेय आणि चक्रीवादळ अवकाशातून कसं दिसतं हे सांगणारी दृश्य याचीच प्रचिती देत आहेत. 


हेसुद्धा वाचा : अस्मानी संकट! 2 वादळं धडकणार? असं झाल्यास हाहाकार अटळ; जाणून घ्या सविस्तर


 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by BBC News (@bbcnews)


चक्रीवादळामुळं जनजीवन विस्कळीत 


बुधवारी रात्रीच्या सुमारासच हे  (Hurricane Idalia) चक्रीवादळ फ्लोरिडाच्या किनारपट्टी भागात धडकलं. ज्यामुळं या भागातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं. अनेक सखल भाग जलमय झाले, वाहनांना नौकांचं रुप आलं. परिस्थिती पाहता प्रशासनानं नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्याचं कामही हाती घेतलं. 


महत्त्वाची बाब म्हणजे फक्त अमेरिकेच्या अग्नेय भागामध्ये इडलियाच नव्हे, तर आणखी एक चक्रिवादळ घोंगावत असल्याचं स्पष्ट होत आहे. ही एकंदर परिस्थिती पाहता तज्ज्ञांनी यंत्रणांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. कारण, इडलियामागोमाग फ्रँकलिन  (Hurricane Franklin) नावाचं वादळही बर्म्युडापाशी घोंगावत आहे. ही दोन्ही वादळं एकमेकांपासून फार दूर नसल्यामुळं सध्या अमेरिकेमध्ये चिंता आणि भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे.