मुंबई : आपल्या आयुष्यात घड्याळ खूप महत्वाचं आहे. जेव्हाही आपल्याला कुठेतरी जायचं असतं किंवा काही काम करायचं असतं तेव्हा आपण वेळ बघायला विसरत नाही. जगातील प्रत्येक घड्याळ 1 ते 12 वाजते, परंतु आज आम्ही तुम्हाला अशा घड्याळाबद्दल सांगणार आहोत ज्यामध्ये 12 वाजत नाहीत. हे ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल, पण हे अगदी खरं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्वित्झर्लंडच्या सोलोथर्न शहरात असंच घड्याळ बसवण्यात आले आहे. ज्यामध्ये फक्त 12 वाजत नसून फक्त एक ते 11 नंबर दिले आहेत. या शहरातील नगर चौकात हे घड्याळ आहे. त्या घड्याळात तासाचे फक्त 11 अंक आहेत. त्यातून 12 क्रमांक गायब आहेत.


या ठिकाणी इतर अनेक घड्याळं आहेत, ज्यामध्ये 12 वाजत नाहीत. या शहराचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे इथल्या लोकांना 11 क्रमांकाची खूप ओढ आहे. या ठिकाणी ज्या कोणत्याही गोष्टी आहेत, त्यांची रचना 11 क्रमांकाभोवती फिरत राहते. 


या शहरातील चर्च आणि चॅपलची संख्या केवळ 11-11 आहे. याशिवाय म्युझियम आणि टॉवर देखील 11 क्रमांकाचे आहेत. मुख्य म्हणजे या ठिकाणी चर्च देखील 11 वर्षांमध्ये तयार झालं होतं. याशिवाय त्याला 11 दरवाजे आणि 11 घंटा आहेत. इथले लोकं 11 नंबरशी इतके जोडले गेले आहेत की ते त्यांचा 11 वा वाढदिवस एका खास पद्धतीने साजरा करतात. 


वाढदिवसाच्या दिवशी प्रसंगी दिलेल्या भेटवस्तू देखील 11 क्रमांकाशी संबंधित आहेत. 11 या क्रमांकाशी लोकांची इतकी ओढ असण्यामागे एक जुना विश्वास आहे. असं म्हणतात की, एके काळी सोलोथर्नचे लोक खूप कष्ट करायचे, परंतु असं असूनही त्यांच्या जीवनात आनंद नव्हता. काही वेळाने टेकड्यांवरून एल्फ येऊ लागले आणि त्या लोकांना प्रोत्साहन देऊ लागले.


एल्फच्या आगमनाने तिथल्या लोकांच्या जीवनात आनंद येऊ लागला. एल्फबद्दल जर्मनीच्या पौराणिक कथांमध्ये असं म्हटलं जातं की, त्यांच्याकडे अलौकिक शक्ती आहे आणि जर्मन भाषेत एल्फचा अर्थ 11 आहे. त्यामुळे सोलोथर्नच्या लोकांनी योगिनीचा संबंध 11 क्रमांकाशी जोडला आणि तेव्हापासून लोक 11 क्रमांकाला महत्त्व देऊ लागले.