जीवसृष्टीचा अंत झाल्यावर पृथ्वी अशी दिसेल; धडकी भरवणारा फोटो व्हायरल, संशोधकही घाबरले
सूयामुळे पृथ्वीचा अंत होणार आहे. 130 कोटी वर्षानंतर पृथ्वीवर एकही सजीव जिवंत राहणार नाही असा दावा या संशोधनात करण्यात आला आहे.
Death of Earth : एक दिवस पृथ्वीचा विनाश होऊन जीवसृष्टीचा अंत होणार आहे. पृथ्वीचा अंत कधी आणि कसा होईल यावर संशोधक संशोधन करत आहेत. याबाबत अनेक दावे केले जात आहेत. मात्र, आता पृथ्वीच्या विनाशाचा एक फोटो व्हायरल झाला आहे. जीवसृष्टीचा अंत झाल्यावर पृथ्वी अशी दिसेल याचा हा फोटो आहे. धडकी भरवाणारा हा फोटो पाहून संशोधकही घाबरले आहेत.
हे देखील वाचा... पृथ्वीला हादरवणारा जगातील सर्वात शक्तीशाली प्रकल्प; याची पावर पाहून NASA चे संशोधकही घाबरले
खगोलशास्त्रज्ञांनी पृथ्वीसारखा ग्रह शोधून काढला आहे. जीवसृष्टी नष्ट झाल्यानंतर कोट्यवधी वर्षांनंतर पृथ्वी देखील अशीच दिसेल अशी भिती संशोधकांनी व्यक्त केली आहे. या फोटोत दिसणारा ग्रह हा एका आगीच्या गोळ्याप्रमाणे दिसत आहे. या ग्रहावर जीवसृष्टी असावी. पृथ्वी ज्या प्रमाणे सूर्याभोवती त्याच प्रकारे हा ग्रह देखील एका ताऱ्याभोवती फिरत होता असा अंदाज संशोधकांनी व्यक्त केला आहे. जर्नल नेचर ॲस्ट्रॉनॉमीमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार 2020 मध्ये हा ग्रह शोधण्यात आला होता. आपल्यापासून सुमारे 4,000 प्रकाशवर्षे दूर, आकाशगंगेच्या मध्यवर्ती फुगवटाजवळ आहे.
सूर्य पृथ्वीला गिळंकृत करणार
सूर्याच्या उत्क्रांतीमुळे आपली सौरमाला निर्माण झाली. आपल्या सूर्यमालेत जीवसृष्टी फक्त पृथ्वीवरच आहे. 450 कोटी वर्षांनंतर पृथ्वीचा अंत होईल. सूर्य आगीचा गोळा होईल. सूर्यावरील हायड्रोजन, संपेल. सूर्यावरील न्यूक्लियर फ्यूजन संपेल. परिणमाी तापमानात वाढ होत राहील. या उष्णतेमुळे सूर्याच्या बाहेरील प्लाज्मा थर संपुष्टात येईल. सूर्य गुरुत्वाकर्षण शक्तीने सूर्यमालेतील ग्रह खेचून घेईल. याच शक्तीने सूर्य पृथ्वीला देखील गिळंकृत करेल.
130 कोटी वर्षानंतर पृथ्वीवरील जीवसृष्टीचा अंत
सूर्याने पृथ्वीला गिळंकृत करण्याआधीच पृथ्वीवरील जीवसृष्टीचा अंत होईल. 130 कोटी वर्षानंतर एकही सजीव जिवंत राहणार नाही. पृथ्वीच्या तापमानात भयानक वाढ होईल. पृथ्वीवरील एकही सजीव उष्णता आणि आर्द्रता सहन करु शकणार नाही. पृथ्वीवरील सर्व महासागरांची वाफ होईल. सूर्याचा प्रकाश सध्याच्या तुलनेत 20 टक्क्यापेक्षा अधिक प्रखर असेल. हा सूर्य प्रकाश डोळ्यांना सहन होणार नाही. मनुष्यच नाही तर पृथ्वीतलावर अस्तित्वात असलेले लाखो जीव मरुन जातील असे वॉशिंग्टन विद्यापीठातील डॉक्टरेट संशोधक रॉडॉल्फो गार्सिया यांनी म्हंटले आहे. पृथ्वीवर विनाशकारी नैसर्गिक घटना घडतील. सूर्यात होणाऱ्या बदलामुळे हे सर्व घडेल असा दावा संशोधकांचा आहे.