फ्रीमध्ये ओव्हरटाईम करणे पडले महागात, गेली नोकरी
आपल्या बॉसच्या पर्यायाने कंपनीच्या नजरेत येण्यासाठी अनेकांना उगाचच ढोरमेहनत करण्याची सवय असते. त्यासाठी ही मंडळी ओव्हरटाईम आणि अती मेहनतही करतात. अर्थात हे पगारवाढ किंवा प्रमोशन इतक्याच माफक इच्छेसाठी असते हे खरे. पण, प्रत्येक वेळी ही हुजरेगीरी कामी येतेच असे नाही.
सिडनी : आपल्या बॉसच्या पर्यायाने कंपनीच्या नजरेत येण्यासाठी अनेकांना उगाचच ढोरमेहनत करण्याची सवय असते. त्यासाठी ही मंडळी ओव्हरटाईम आणि अती मेहनतही करतात. अर्थात हे पगारवाढ किंवा प्रमोशन इतक्याच माफक इच्छेसाठी असते हे खरे. पण, प्रत्येक वेळी ही हुजरेगीरी कामी येतेच असे नाही.
बार्सिलोन येथील जीन पी नावाच्या एका कामगाराला ही हुजरेगीरी चांगलीच महागात पडली. हा पठ्ठा कंपनीने ठरवून दिलेल्या वेळेपेक्षा लवकर कामावर हजर होत असे. तसेच, तो कंपनीत अधिक वेळही थांबत असे. त्याच्या या वर्तनावर कंपनी व्यवस्थापन चांगलेच संतापले. अती काम आणि वेळेआधी कामावर येण्याच्या कारणावरून कंपनीने त्याला सस्पेंड केले. बार्सिलोन येथील 'लिड्ल' नावाच्या कंपनीत हा प्रकार घडला.
मीडिया रिपोर्टनुसार, जीन पी हा कर्मचारी लिड्ल कंपनीच्या बार्सिलोन ब्रांचमध्ये कामाला होता. तो पहाटे ५ वाजता कंपनीत येत असे. तसेच, कंपनीचा सर्व स्टाफ घरी जाईपर्यंत म्हणजेच कार्यालय बंद होईपर्यंत काम करत असे. कंपनीमध्ये अधिक वेळ घालवल्याने कंपनीच्या नियम आणि अटींचा भंग झाल्याचे कारम देत कंपनीने त्याला कामावरून काढून टाकले आहे.
नेमका दोष काय/
एकाद्या कर्मचाऱ्याला कंपनी व्यवस्थापनाने अशा पद्धतीने काढून टाकल्याने अनेकांच्या भूवया उंचावणे स्वाभाविकच होते. पण, कंपनीच्या कार्यालयात एकटे राहून काम करणे तसेच, फ्रीमध्ये ओव्हरटाईम करणे या कारणास्तव व्यवस्थापनाने त्याला दोषी ठरवले.
दरम्यान, कंपनी व्यवस्थापनाच्या निर्णयाविरोधात जीन पी केने न्यायालयात दाद मागितली आहे. जीन पीच्या वकीलाने म्हटले आहे की, जीन पी के हा कर्मचारी गेली १२ वर्षे या कंपनीत काम करत आहे. पण, इतक्या प्रदीर्घ काळात कंपनीने त्याला कधीच कल्पना दिली नव्हती की, वेळेच्या आधी कार्यालयात येणे आणि जास्त वेळ काम करणे हा गुन्हा आहे. किंवा असे करणे कंपनीच्या नियमांचे उल्लंघन आहे.