नवी दिल्ली : बर्गर खाणे अनेकांना आवडते. मात्र एक व्यक्ती असा आहे ज्याला बर्गर खाणे प्रचंड आवडते. या व्यक्तीने तब्बल आतापर्यंत ३०,००० बर्गर खाल्ल्ते. मात्र इतक्याने त्याचे मन भरले नाहीये. या व्यक्तीला ४० हजार बर्गर खायचे आहेत. इतके बर्गर खाल्ल्यानंतर त्याला त्याच्या आरोग्याबद्दल विचारण्यात आले असता तो म्हणाला, मी पूर्णपणे फिट आहे. तसेच शरीरातील कॅलरीजचे प्रमाणही सामान्य आहे. 


१९७२पासून खातोय बर्गर


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही व्यक्ती अमेरिकेच्या विस्कॉन्सिन येथे राहते. मीडिया रिपोर्टनुसार डॉन गोर्स्के १९७२पासून मॅकडोनल्डचा मॅक बर्गर खातोय. ही सवय कायम ठेवत या महिन्यात त्याने ३० हजारावा बर्गर खाल्ला. ६४ वर्षीय गोर्स्केच्या मते गेल्या ४६ वर्षापासून तो दररोज मॅक बर्गर खातोय. मात्र दररोज बर्गर खाऊन त्याला कंटाळा आलेला नाही. 


गिनीज बुकात नावाची नोंद


गोर्स्केने दिलेल्या माहितीनुसार, त्याच्याकडे खरेदी केलेल्या बिग मॅक बर्गरची रिसीटही आहे. त्याच्याकडे याबाबतचा पुरावाही आहे. २०१६मध्ये २८, ७८८ बर्गर खाल्ल्यानंतर त्याची गिनीज बुकात नोंद झाली.


४६ वर्षात केवळ ८ दिवस खाल्ला नाही बर्गर


डॉन गोर्स्केच्या माहितीनुसार हा व्यक्ती दिवसाला दोन बर्गर खातो. गेल्या ४६ वर्षात त्याने केवळ ८ दिवस बर्गर खाल्लेला नाही. या ८ दिवसांपैकी एके दिवशी त्याच्या आईचे निधन झाले होते त्यादिवशी त्याने बर्गर खाल्ला नव्हता.


४० हजार बर्गर खाण्याचे लक्ष्य


गोर्स्केचे ४० हजार बर्गर खाण्याचे लक्ष्य आहे. हे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी त्याला आणखी १४ वर्षे लागणार आहेत. यासाठी तो तयार आहे.