न्यूयॉर्क : वृत्तवाहिनीवर लाईव्ह कार्यक्रमाचे सूत्रसंचलन करताना एका महिला अॅंकरला भलत्याच परिस्थितीचा सामना करावा लागला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरू असतानाच तिला प्रसुतीकळा सुरू झाल्या. पण, तिने त्याही स्थितीत सूत्रसंचलन कायम ठेवले आणि आपला कार्यक्रम पूर्ण केला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नेटली पास्कक्व्रेला असे या महिला अॅंकरचे नाव आहे. काही महिन्यांपासून गर्भवती असलेली नेटलीच्या प्रसुतीला काही दिवसांचा अवधी होता. त्यामुळे अद्यापही ती सूत्रसंचालक म्हणून काम करत होती. मात्र, एका कार्यक्रमादरम्यान सूत्रसंचालन सुरू असतान अचानकच तिला प्रसुतीकळा यायला सुरूवात झाली. या वेळी ती ट्विटरवरील वाढती शब्दमर्यादा या विषयावर चर्चा करत होती. ही चर्चा थेट प्रक्षेपीत होत होती. अचानक तिला जाणवले पोटात काहीतरी गडबड होत आहे. वेदनाही येत आहेत. पण, तीने त्या वेदना हसतमुख चेहऱ्याने सहन केल्या. शो पूर्ण केला. 



दरम्यान, तिने आपल्या कळांबाबत सहकाऱ्यांना सांगितले. त्यानंतर तिच्या सहकाऱ्यांनी तिला रुग्णालयात दाखल केले. तब्बल १३ तासांच्या उपचारानंतर तिने गोंडस बाळाला जन्म दिला. या वेळी तिचा पती जामिन हा सुद्ध रूग्णालयात उपस्थित होता.



या दाम्पत्याने आपल्या बाळाचे नाव जेम्स असे ठेवले.