अमेरिका : 1945 मध्ये अमेरिकन सैन्याने हिरोशिमा आणि नागासाकी या जपानी शहरांवर अणुबॉम्ब टाकले. या हल्ल्यात लाखो लोकांना आपले प्राण गमवावे लागले आणि अनेकांना अपंगत्व आले. अमेरिकेने सर्वप्रथम हिरोशिमावर अणुबॉम्ब टाकला. जिथे आजही मानवी दिसणारी सावली दिसते, जी गेल्या 75 वर्षांपासून अशीच दिसते. त्याचे रहस्य आजपर्यंत कोणालाही कळू शकलेलं नाही. या सावलीला 'The Hiroshima Steps Shadow' किंवा 'Shadows of Hiroshima' या नावाने ओळखलं जातं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुसऱ्या महायुद्धात जेव्हा हिरोशिमावर अणु हल्ला झाला तेव्हा लाखो लोक मरण पावले. ही सावलीची प्रतिमा स्फोटाच्या ठिकाणापासून 850 फूट अंतरावर घेण्यात आली होती, जिथे एक व्यक्ती बसली होती. अणुबॉम्बच्या अफाट शक्तीने ती व्यक्ती गायब केली असा दावा अनेकांकडून केला जातो. पण अणुबॉम्बही त्याची सावली पुसू शकला नाही. तिथे बसलेली व्यक्ती कोण होती हे या सावलीचं वास्तव कधीच ओळखता आलं नाही. ते आजपर्यंत गूढच राहिलंय.



अंदाजानुसार, हिरोशिमा अणुस्फोटात सुमारे एक लाख 40 हजार लोकांचा मृत्यू झाला होता. जेव्हा स्फोट झाला तेव्हा त्यातून भयंकर ऊर्जा बाहेर पडली आणि त्याच्या उष्णतेमुळे सुमारे 60 हजार ते 80 हजार लोकांचा मृत्यू झाल्याचं म्हटलं जातं. हिरोशिमावर टाकलेल्या अणुबॉम्बचं नाव 'लिटल बॉय' होतं, ज्याचं वजन सुमारे 4400 किलो होतं.


या बॉम्बच्या स्फोटामुळे जमिनीच्या पातळीवर सुमारे चार हजार अंश सेल्सिअसची उष्णता निर्माण झाल्याची माहिती आहे. 50 ते 55 डिग्री सेल्सिअसची उष्णता जेव्हा माणूस सहन करू शकत नाही, तेव्हा तो 4,000 डिग्री सेल्सिअसची उष्णता कशी सहन करणार? या उष्णतेने लोक जळून राख झाले होते.