मुंबई : तारुण्याची कितीही आस असली तरी ऐन पन्नाशीत सोळा वर्षाच्या मुलीसारखे दिसणे शक्य नाही. मात्र जगात अशक्य असं काहीच नाही. ही युक्ती इंडोनेशियामध्ये राहणाऱ्या एका महिलेने सत्यात उतरवली आहे. तिला बघून तिच्या नेमक्या वयाबद्दल अंदाज बांधणं कठीण होतं. अनेकांना ती कॉलेजची विद्यार्थिनी भासते. तर तिच्या मुलासोबत बाहेर फिरताना ती अनेकांना त्याची गर्लफ्रेंड वाटते. त्यामुळे ही महिला म्हणजे सोशल मीडियात चर्चेचा विषय ठरत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तर या महिलेचं नाव आहे पुष्पा देवी. तिचं वय आहे ५० वर्षे, पण तिने स्वत:चं तारुण्य अजूनही जपलं आहे. ती व्यावसायिक आहे. अनेकदा ती इंडोनेशियामधील कार्यक्रम आणि चर्चासत्रामध्ये सहभागी होते, त्यामुळे एव्हाना ती सगळ्यांच्या परिचयाची झाली आहे.


इन्स्टग्रामवर तिचे तब्बल २ लाख ५० हजारांहून अधिक फॉलोवर्स आहेत. पुष्पाला दोन मुलं आहेत. त्यांचं वय २० वर्षांहून अधिक आहे. त्यामुळे जेव्हा पुष्पा आपल्या दोन मुलांसोबत बाहेर जाते त्यावेळी अनेक जण दोघांनाही प्रेमी युगुल समजण्याची चूक करतात. पण हे सारं मी खूप एन्जॉय करते असंही पुष्पा म्हणते. योग्य आहार, व्यायाम हे माझ्या तारुण्याचं रहस्य असल्याचं पुष्पा अभिमानाने सांगते.