कॅनबरा : हिंदू पौराणिक गोष्टींमध्ये भगवान शंकर यांना तीन डोळे असण्याची गोष्ट सांगण्यात आली आहे. आता तीन डोळे असणारा साप असल्याची घटना समोर आली आहे. तीन डोळे असणारा साप भारतापासून जवळपास ७८०९ किलोमीटर दूर ऑस्ट्रेलियामध्ये आढळला आहे. वृत्तसंस्थेच्या दाव्यानुसार, पहिल्यांदाच तीन डोळे असणारा साप आढळल्याचे सांगण्यात आले आहे. वन्यजीव विशेषज्ञ तीन डोळ्यांच्या सापाच्या प्रजातीबद्दल अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


ऑस्ट्रेलियातील हंप्टी डूच्या रस्त्यांवर तीन डोळ्यांचा साप आढळला. पाहिल्यानंतर लगेच त्याचा फोटो काढण्यात आला. सापाचे तीनही डोळे चांगलं काम करत होते. त्यानंतर या सापाबाबत अधिक माहिती मिळवण्यास सुरुवात झाली. परंतु या सापाचा काही मृत्यू झाला. जीवशास्त्रज्ञांनी या सापाला 'मॉन्टी पायथन' असं नाव दिलं आहे.



उत्तरी क्षेत्र पार्क आणि वन्यजीव आयोगाने एका फेसबुक पोस्टमध्ये या सापाच्या एक्स-रे रिपोर्टनुसार, त्याचे तीनही डोळे काम करत असल्याचं सांगितलं ४० सेमीचा (१८ इंची) साप जवळपास तीन महिन्यांचा होता. त्याला एका ठिकाणी बंद केल्याच्या जवळपास एक महिन्यानंतर त्याचा गेल्या आठवड्यात मृत्यू झाला. या सापाचा मृत्यू झाला असला तरी वन्यजीव वैज्ञानिक या प्रजातीबाबत अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. फेसबुकवर पोस्ट केल्या गेलेल्या या तीन डोळ्यांच्या सापाबद्दल मोठं आकर्षण निर्माण झालं आहे.