नवी दिल्ली : चीनने जगासाठी आपली दालनं उघडली आहेत, तिबेटच्या विकासालाही त्यांनी अग्रक्रम दिला पाही़जे, असं दलाई लामा म्हणाले.


असं म्हणाले दलाई लामा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तिबेटला चीनपासून स्वातंत्र्य नकोय तर विकासाची अपेक्षा आहे. भूतकाळातील कटू अनुभव मागे सोडून आपण पुढे गेलं पाही़जे असं मत दलाई लामांनी व्यक्त केलं. तिबेटच्या स्वातंत्र्याची नाही तर अधिकाधिक विकासाची अपेक्षा त्यांनी व्यक्त केलीय. दलाई लामा हे तिबेटी लोकांचे अध्यात्मिक नेते असून १९५९ साली ते चीनने तिबेटवर केलेल्या आक्रमणानंतर तिबेटमधून परागंदा झाले होते. त्यानंतर त्यांनी भारतात राजकीय आश्रय घेतलाय.


चीनचा डाव


चीनने तिबेटच्या लोकांचा आणि त्यांच्या संस्कृतीचा सन्मान केला पाहीजे अशा भावना दलाई लामांनी व्यक्त केल्या आहेत. चीन मात्र सातत्याने दलाई लामा हे चीनविरोधी कारवाया करत असल्याचा आरोप करत आला आहे. चीन दलाई लामांचं नेतृत्व मान्य करत नाही. 


मवाळ भूमिका


दलाई लामांनी आपली मूळ भूमिका बरीच मवाळ केलीय. सुरुवातीपासून त्यांनी तिबेटच्या स्वातंत्र्याची मागणी करत त्यासाठी मोठा संघर्ष केलाय. शेकडो तिबेटी लोकांनी त्यासाठी बलिदान केलयं. मात्र आता परिस्थितीनुरूप त्यांनी आपली भूमिका मवाळ केली आहे.


तिबेटचा जागतिक महत्व


यांगत्से आणि सिंधू नदीसारख्या महत्वातच्या नद्या तिबेटच्या पठारावरच उगम पावतात. त्यावर अब्जावधी लोक अवलंबून असल्यामुळे, तिबेटच्या पठाराची काळजी घेणं म्हणजे अब्जावधी लोकांची काळजी घेण्यासारखंच आहे. चीनने या बाबींचा विचार केला पाहीजे अशा भावना दलाई लामांनी एका चर्चेत व्यक्त केलयं.