बॅंकॉक: असे म्हणतात की, एक छायाचित्र दहा हजार शब्दांचे काम करते. याची प्रचिती पुन्हा एकदा आली असून, छायाचित्राची ताकदही दिसली आहे. एका छायाचित्रामुळे थायलंडच्या उप-पंतप्रधानांना चक्क आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. त्यांच्या राजीनाम्याला कारण ठरले आहे छायाचित्रत झळकणारे हाताली घड्याळ.


घड्याळाची काळ वेळ योग्य पण, राजकीदृष्ट्या चुकीची


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

होय, घड्याळाने चुकवला उप-पंतप्रधानाच्या खुर्चीचा ठोका, अशी वेळ थायलंडचे उप-पंतप्रधान प्रावित वॉन्गसुआन यांच्यावर खरोखरच आली आहे. ४ डिसेंबर २०१७ला बॅंकॉक येथे पार पडलेल्या एका सरकारी कार्यक्रमादरम्यान उप-पंतप्रधान प्रावित यांच्या हातात एक महागडे घड्याळ आणि बोठात हिऱ्याची एक आंगठी पहायला मिळाली. उपस्थित पत्रकारांनी घड्याळ आणि हिऱ्याची आंगठी दिसेल अशा बेताने प्रावित यांची छबी टिपली. झाले, अल्पावधीतच हे छायाचित्र थायलंडमध्ये जोरदार व्हायरल झाले. त्यामुळे सोशल मीडियातून प्रावित यांच्याबद्धल लोकांकडून जोरदार आवाज उठवण्यात आला. ज्यामुळे प्रावती यांच्यावर वाईट वेळ आली आणि त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला.


जनमताचा आदर करत राजीनामा


दरम्यान, दावा करण्यात येत आहे की, प्रावित वॉन्गसुआन यांच्याकडे सुमारे २५ लग्जरी घड्याळे आहेत. या घड्याळांबाबतचा कोणताच खुलासा त्यांनी जनतेकडे केला नाही. थायलंडच्या सुमारे ६१,२०० लोकांनी एका पत्रावर स्वाक्षरी मोहिम राबवत प्रावित यांच्या राजनीम्याची मागणी केली. शेवटी जनमताचा आदर करत त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला.