Nepal Plane Crash : `त्या` भीषण अपघातात TikTok स्टारचा करुण अंत; विमानातला अखेरचा VIDEO प्रचंड व्हायरल
Nepal Plane Crash : नेपाळ विमान अपघाताचं वृत्त समोर आलं आणि त्यानंतर लगेचच काही व्हिडीओ व्हायरल झाले. या व्हिडीओंमध्ये विमानाचा अपघात होण्याआधीची दृश्य मन सुन्न करणारी होती.
Nepal Plane Crash : नेपाळ विमान अपघाताचं वृत्त समोर आलं आणि संपूर्ण जगालाच हादरा बसला. 68 प्रवासी आणि 4 क्रू मेंब्रर्सना घेऊन निघालेल्या या विमानानं एकाएकी दिशा बदलली आणि ते प्रचंड वेगानं जमिनीच्या दिशेनं कोसळलं. काही कळण्याच्या आतच या विमानानं स्फोट घेतला आणि सारंकाही भस्म झालं (Airplane crash). सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या अनेक व्हिडीओंच्या माध्यमातून या अपघाताची हीच दृश्य सध्याच्या घडीला समोर आली आहेत. विमानात असणाऱ्यांमध्ये नेपाळमधील एक लोकप्रिय व्यक्तीसुद्धा प्रवास करत होती. काळानं, तिलाही हिरावलं. (Tikto star Oshin Ale Magar lost her life in nepal plane crash watch viral video latest Marathi news )
ओशिन आले मगर असं त्या लोकप्रिय व्यक्तीचं नाव. नेपाळमध्ये ती TikTok स्टार ओशिन म्हणून प्रचंड लोकप्रिय. तिचे व्हिडीओही तिथं कमालीची पसंती मिळवतात. पण, आता मात्र तिच्या निधनाच्या वृत्तावर शिक्कामोर्तब झालं आणि अनेकांच्याच पायाखालची जमीन सरकली. आता तो प्रसन्न चेहरा आपल्याला कधीच पाहता येणार नसल्याचं म्हणत तिला फॉलो करणाऱ्यांनी सोशल मीडियावर दु:ख व्यक्त केलं.
ओशिनचा तो शेवटचा व्हिडीओ...
ओशिन (Oshin Ale Magar) असलेल्या विमानाचा अपघात होण्याआधीच तिनं एक व्हिडीओ शेअक केला होता. या व्हिडीओमध्ये ती आनंदात असल्याचं दिसत होती. 'जो जिता वही सिकंदर' या चित्रपटातील 'पहला नशा' गाण्याची धून जोडीला असणारा एक व्हिडीओ तिनं शेअर केला होता. हा व्हिडीओ पाहताना माणसानं इतकं सुंदर असावं असंच अनेकांना वाटलं. पण, तेव्हा हा ओशिनचा अखेरचा व्हिडीओ (Airplane crash last video) असेल अशी कल्पनाही कुणी केली नव्हती.
आतापर्यंत 68 मृतदेह हाती लागले....
नेपाळमधील पोखरा विमानतळावर लँड होण्याच्या काही क्षण आधीच एक विमान क्रॅश झालं आणि महाभयंकर अपघातानं अनेकांनाच हादरा बसला. तब्बल 72 जणांना नेणाऱ्या या विमानाला झालेला अपघात इतका भयंकर होता की पाहणाऱ्यांच्यासुद्धा काळजात चर्रSSS झालं. सध्याच्या घडीला घटनास्थळावरून 68 मृतदेह ताब्यात घेण्यात आल्याची माहिची देण्यात आली आहे. तर, उरलेल्या 4 जणांचा शोध घेण्याचं काम अद्यापही सुरु आहे.
हेसुद्धा वाचा : Nepal Plane Crash : नवस फेडून परतताना फेसबुक लाईव्ह सुरु केलं आणि... विमान अपघातात 'त्या' भारतीयाचा दुर्दैवी मृत्यू
प्राथमिक माहितीनुसार या विमानात उत्तर प्रदेशातील गाझीपूर येथे वास्तव्यास असणारे 4 प्रवासीही प्रवास करत होते अशी माहिती समोर आली आहे. नेपाळ सिविल असोसिएशन अथॉरिटीच्या माहितीनुसार हे विमान यती एअरलाईन्सचं होतं. यामध्ये 15 परदेशी नागरिकांचा समावेश होता.