TikTok ला आणखी एक झटका, हाँगकाँगमध्येही बंदी
चीनला आणखी एक फटका
मुंबई : Tiktok (टिकटॉक)ने सोमवारी हाँगकाँगच्या मार्केटमधून बाहेर पडण्याचे संकेत दिले आहेत. सोमवारी खूप उशिरा टिकटॉकच्या प्रवक्ताने रॉयटर्सला याबाबत माहिती दिली आहे. या क्षेत्रातून आता फेसबुकसह अनेक टेक्नॉलॉजी कंपन्या आपलं काम थांबवत आहेत. कंपन्यांनी एवढा महत्वाचा निर्णय हा येथील सरकारने आखून दिलेल्या नियमावलीमुळे घेतला आहे.
मार्केटबद्दल प्रश्न विचारला असता टिकटॉकच्या प्रवक्ताने म्हटलं की,'सध्याच्या परिस्थितीचा उत्पदनावर मोठा परिणाम होत आहे. यामुळेच टिकटॉकने हाँगकाँग येथील ऑपरेशन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.'
चीनची कंपनी बाइट डान्स (Byte Dance) च्या व्हिडिओ ऍप टिकटॉकने राष्ट्रीय सुरक्षेच्या कायद्यानुसार येथून आपल्या व्यवसाय थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. ही कंपनी आता वॉल्ट डिझ्नीच्या माजी सहकंपनी असलेल्या केविन मेयरद्वारे चालवली जाणार आहे.
पुढे त्यांनी सांगितलं की, टिकटॉक ऍपवरील युझर्सचा डाटा हा चीनमध्ये स्टोर केला गेलेला नाही. भारतीय युझर्सचा डाटा हा सिंगापुर सर्वरमध्ये स्टोर करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वीच भारत सरकारने चीनचे ५९ ऍपवर बंदी आणली आहे. ज्यामध्ये टिकटॉकचा देखील समावेश आहे. धक्कादायक बाब म्हणजे टिकटॉक ऍप चीनमध्ये वापरलं जात नाही कारण त्याला चीनमध्ये लाँचच केलं नाही.
चीनी ऍपवर भारत सरकारने कारवाईचा इशारा दिला आहे. त्यामुळे सरकारने सुरूवातीपासूनच बीजिंगपासून लांब राहणंच पसंत केलं आहे. चीन सरकार ऍपवर स्टोर केलेला डाटा मागत नाही. पण मागितलाच तर याची परवानगी दिली जाणार नाही.