मोदींच्या शिरपेचात मानाचा तुरा, Time Magazineच्या 100 प्रभावशाली लोकांमध्ये पंतप्रधानांना स्थान
अमेरिकेतील टाईम मॅगझीनने (Time Magazine) 2021 मधील 100 प्रभावशील व्यक्तींची यादी जाहीर केली आहे.
न्यूयॉर्क : अमेरिकेतील टाईम मॅगझीनने (Time Magazine) 2021 मधील 100 प्रभावशील व्यक्तींची यादी जाहीर केली आहे. यामध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी स्थान दिलं आहे. मोदींसह यामध्ये पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banarjee), सीरम इंस्टीट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदार पूनावाला (Adar Poonawala) यांनाही सामिल करण्यात आलं आहे. (Time Magazines list of 100 Most Influential People includes pm narednra modi Mamata Banerjee and Adar Poonawala)
कमला हॅरिस यांनाही स्थान
टाईमने आज बुधवारी (15 सप्टेंबर) 100 प्रभावशाली लोकांची यादी जाहीर केली. या यादीमध्ये विविध क्षेत्रातील दिग्ग्जांचा समावेश आहे. यात अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडन, चीनचे राष्ट्रापती शी जिनपींग, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचाही समावेश आहे. विशेष म्हणजे यामध्ये भारतीय वंशाच्या असलेल्या आणि अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांनाही स्थान मिळालं आहे. त्यामुळे भारतासाठी ही अभिनास्पद बाब आहे. एकूण 6 विविध क्षेत्रातील दिग्गजांचा या यादीत समावेश केला जातो. उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना या यादीत स्थान दिलं जातं.