Titanic Tourist Submersible: 112 वर्षांपूर्वी समुद्रात बुडालेले टायटॅनिक जहाज पाहायला घेऊन गेलेल्या पर्यटकांच्या पाणबुडीचा संपर्क तुटला आहे. 18 जूनपासून या पाणबुडीचा संपर्क झालेला नाही. मध्य अटलांटिक महासागरामध्ये या पाणबुडीची शोधमोहिम सुरु आहे.  पाणबुडीतील ऑक्सीजन साठा कधीही संपू शकतो. अशातच आता याबाबत आता मोठी अपडेट समोर आलेली आहे. पाणबुडीतील ऑक्सिजन संपण्याआधीच यांचा मृत्यू झाला असावा अशी शंका तज्ञांनी उपस्थित केली आहे. यामुळे Titanic चे अवशेष पाहण्यासाठी गेलेल्या पाच जणांच्या जिवंत असण्याची शक्यता कमी असल्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. कार्बन डायऑक्साइडच्या विषबाधामुळे यांचा मृत्यू झाला असावा अशी शंका देखील उपस्थित केली जात आहे. 


टायटन पाणबुडी 5 दिवसांपासून बेपत्ता


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टायटन ही पाणबुडी पाच दिवसांपासून बेपत्ता झाली आहे. अटलांटिक समुद्रात बुडालेल्या टायटॅनिक या अजस्र जहाजाची पाहणी करायला ही पानबुडी गेली होती. या पाणबुडीत पाकिस्तानमधील अब्जाधीश पिता-पुत्र आणि ब्रिटनमधील एक उद्योजक यांच्यासह एकूण पाच जण होते. या पाणबुडीत पाकिस्तानी अब्जाधीश शहज़ादा दाऊद, त्यांचे सुपुत्र सुलेमान, ब्रिटनचे व्यावसायित हामिश हार्डींग यांच्यासह ओशनगेट कंपनीचे सीईओ स्टॉकटन रश, फ्रेंच संशोधक पॉल आनरी नार्जेलेट प्रवास करत आहेत.


ऑक्सीजन साठा कधीही संपू शकतो


पाणबुडीतील ऑक्सिजन साठा कधीही संपू शकतो. यामुळे या पाणुबुडीवर उपस्थित असलेले लोकांना हा साठा किती तासांपर्यत पुरेल याचा अंदाज लावणे कठीण असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. अद्यापपर्यंत या पाणबुडीशी काहीही संपर्क झालेला नाही.  मध्य अटलांटिक महासागरामध्ये खोल पाण्यात या पाणबुडीचा शोध घेतला जात आहे. 


पाणबुडीतील ऑक्सिजन संपण्याआधीच प्रवाशांचा मृत्यू झाल्याची शंका


पाणबुडीतील ऑक्सिजन संपण्याआधीच प्रवाशांचा मृत्यू झाल्याची शंका व्यक्त केली जात आहे. रॉयल नेव्हीचे अनुभवी पाणबुडे यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार पाणबुडी बेपत्ता होण्याआधीच यांचा मृत्यू झाला असावा. कारण, टायटन सारख्या पाणबुडींमध्ये विशिष्ट प्रकारच्या बॅटरी असतात. या बॅटरी संपल्यामुळे पाणबुडीचा संपर्क तुटला असावा. या बॅटरी संपल्यावर यातून मोठ्या प्रमाणात कार्बन डायऑक्साइड वायू उत्सर्जित होतो. या कार्बन डायऑक्साइडच्या विषबाधेमुळे पाणबुडीत असलेल्या पाचही जणांचा मृत्यू झाला असावा अशी भिती देखील व्यक्त केली जात आहे. यामुळे पाणबुडीतील ऑक्सिजन साठा संपण्याआधीच यांचा मृत्यू झाला असावा असा देखील तज्ञांचा अंदाज आहे.