Plastic in Men Testicles : संपूर्ण जगासाठी धोकादाय ठरत असलेला घातक पदार्थ आता  पुरुषांच्या अंडकोषापर्यंत पोहोचला आहे. या पदार्थ कधीच नष्ट होत नाही किंवा खराब होत नाही. हा धोकादायक पदार्थ म्हणजे प्लास्टिक आहे. प्लास्टिकचे कण  पुरुषांच्या अंडकोषापर्यंत पोहोचल्याच्या धक्कादायक माहिती एका अभ्यासातून समोर आली आहे. या नविन संशोधकामुळे चिंता वाढली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

न्यू मेक्सिको विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी याबाबत संशोधन केले. या संशोधनाअंतर्गत कुत्रे आणि मानवांच्या अंडकोषाच्या ऊतींचे परीक्षण करण्यात आले. यासंशोधनात  अंडकोषात मायक्रोप्लास्टिकचे कण आढळले आहेत. कुत्र्यांच्या तुलनेत मानवाच्या अंडकोषांमध्ये तीनपट जास्त मायक्रोप्लास्टिक आढळले आहेत. 


कुत्र्यांच्या टेस्टिक्युलर टिश्यूच्या प्रत्येक ग्रॅममध्ये, 122.63 मायक्रोग्राम प्लास्टिक आढळले आहेत. तर, मानवांमध्ये हा प्रमाण 329.44 मायक्रोग्राम इतके आढळून आले. मानवाच्या शरीरात प्लास्टिकचा फैलाव  वेगाने होत आहे. प्लास्टिक मानवाच्या शरीराच्या भागात जात पसरत आहे. प्लास्टिकच्या कणांचा पुरुषांच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम होण्याची भिती व्यक्त केली जात आहे. 


पुढील पिढीसाठी धोक्याचा इशारा


न्यू मेक्सिको विद्यापीठातील शास्त्रज्ञ झियाओझांग यू हे या संशोधन टीमचे सदस्य आहेत. त्यांनी  या संशोधनाबाबत अधिक माहिती दिली. मानवाच्या  शरीरात मायक्रोप्लास्टिकचे कण असू शकतात अशी  सुरुवातील शंका होती. मात्र, संशोधनात पुरुषांच्या प्रजनन अवयवांमध्ये मायक्रोप्लास्टिकचे कण शिरल्याचे आढळून आले. कुत्र्याची तपासणी केली असता आश्चर्याचा धक्का बसला. जेव्हा मानवांची तपासणी केली गेली तेव्हा  प्लास्टिकचे कण  पुरुषांच्या अंडकोषापर्यंत पोहोचल्या उघडकीस आले आहे.  मानवाच्या शरीरात सापडलेले मायक्रोप्लास्टिकचे कण पुढील पिढीसाठी धोक्याचा इशारा ठरु शकतात. याच थेट परिणाम पुरुषांच्या प्रजनन क्षमतेवर होऊ शकतो अशी भिती झियाओझांग यू यांनी व्यक्त केली आहे. 


पुरुषांच्या अंडकोषांमध्ये आढळले 12 प्रकारच्या प्लास्टिकचे कण


पुरुषांच्या अंडकोषांमध्ये 12 प्रकारच्या प्लास्टिकचे कण आढळले आहेत. त्यात पॉलिथिलीन (पीई) जास्तीत जास्त प्रमाणात आढळले आहे. यापासून प्लास्टिक पिशव्या आणि प्लास्टिकच्या बाटल्या तयार केल्या जातात. यामुळे प्लास्टिकचे सर्वाधिक प्रदूषण होते आहे.


शुक्राणुवर परिणाम


या मायक्रोप्लास्टिकचा शुक्राणुवर परिणाम होत असल्याचे दिसून आले आहे. कुत्र्यांच्या शुक्राणूंमध्ये पॉलिव्हिनाईल क्लोराईड (पीव्हीसी) मोठ्या प्रमाणात आढळून आले आहे. हा प्लास्टिकचा एक प्रकार आहे. त्यामुळे कुत्र्यांचे शुक्राणूंची संख्या कमी होत असल्याचे दिसून आले.  टॉक्सिकोलॉजिकल सायन्सेसमध्ये या संदर्भातील अहवाल प्रकाशित झाला आहे.