टोकियो: टोकियो ऑलिम्पिकच्या स्पर्धा सुरू आहे. स्पर्धा रंगात आल्या असताना सोशल मीडियावर एक व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. हा व्हिडीओ कोणत्याही खेळाडूचा किंवा तिथे घडलेल्या एका प्रसंगाचा नाही. तर चक्क टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा पाहणाऱ्या प्राण्याचा आहे. वाचून तुम्हालाही दोन सेकंद असं वाटेल अरे हे काय? पण होय मांजरीचे व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की मांजर कशी या अॅथलीटला पंजा मारत आहे. टीव्हीवर ऑलिम्पिकच्या स्पर्धा सुरू आहेत. त्या पाहण्यात सुरुवातीला ही मांजर दंग आहे. मात्र नंतर ती या अॅथलीटसोबत खेळण्याचा प्रयत्न करते. अशा या मांजरीचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहे. 








या व्हिडीओमध्ये पाहू शकता की मांजर टीव्हीच्या स्क्रीनसमोर बसली आहे. सुरुवातीला ती खेळ शांतपणे पाहाते मात्र नंतर ती त्यांच्यासोबत खेळण्याचा प्रयत्न करते. टीव्हीवर पंजा मारण्याचा प्रयत्न करते. जीमनॅस्ट ज्या पद्धतीनं आपल्या हातापायाची हलचाल करतात तशा पद्धतीनं मांजर आपली मान इकडे तिकडे फिरवते आहे. या मजेशीर व्हिडीओने युझर्सचं मन जिंकलं आहे. सोशल मीडियावर व्हिडीओ वेगानं व्हायरल होत आहेत.