OMG! रुळावर अचानक थांबलं विमान, समोरून आली भरधाव ट्रेन आणि...
ट्रेनची विमानाला जोरदार धडक... एका सेकंदात झाले एवढे तुकडे... पाहा भीषण अपघाताचा थरारक व्हिडीओ
कॅलिफोर्निया : रेल्वे गाडीचा स्पीड एवढा भयंकर असतो की त्याच्या समोर जर कोणी आलं तर काय होईल याचा नुसता विचार करणंही अंगावर काटा आणण्यासारखं आहे. याच भीषण ट्रेननं विमानाला धडक दिली आणि काही सेकंदात अनेक तुकडे झाले. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
दैव बलवत्तर म्हणून विमानचालकाचा जीव वाचला. तिथे वेळीच पोलीस आले आणि त्यांनी वैमानिकाला वाचवलं. अपघातग्रस्त विमान ट्रेनला धडकण्यापूर्वी काही सेकंद आधी पोलिसांनी पायलटला बाहेर काढलं. हा व्हिडीओ अमेरिकेतील कॅलिफोर्नियातील लॉस एंजेलिस शहरातील असल्याची माहिती मिळाली आहे.
या व्हिडीओमध्ये पाहू शकता की, काही सेकंदानंतर भरधाव ट्रेननं अपघातग्रस्त विमानाला धडक दिली. या विमानाचे तुकडे दूरवरपर्यंत उडाले होते. WION च्या रिपोर्टनुसार टेकऑफनंतर काही क्षणात विमान दुर्घटनाग्रस्त झालं. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे.
या व्हिडीओमध्ये पोलीस वैमानिकाचा जीव वाचवत असल्याचं दिसत आहे. काही क्षणात भरधाव ट्रेन रुळावरून जाताना दिसते. ही ट्रेन विमानाला धडक देत आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.