मुंबई : हरनाज सिंधूने मिस युनिव्हर्स 2021 चा खिताब जिंकून देशाचं नाव उंचावलं आहे. 21 वर्षांनंतर भारताच्या नावावर हा किताब घेत देशाच्या कन्येने सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद आणलाय. हरनाजने विचारलेल्या प्रश्नालाही खूप छान उत्तरं दिली आहेत. यासोबतच ज्यावेळी ती जिंकली त्यावेळच्या तिच्या गाऊनची सर्वत्र चर्चा झाली. हा गाऊन साईशा शिंदेने डिझाइन केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हरनाजने घातलेला गाऊन सर्वांचच लक्ष वेधलं होतं. हरनाजने बेज आणि सिल्वर एम्बेलिश्ड गाऊन घातला होता.  हा गाऊन साईशा शिंदेने डिझाइन केला होता. हरनाज सिंधूचा अंतिम फेरीचा गाऊन तीन भागांमध्ये विभागला गेला होता. जर मिस युनिव्हर्सच्या गाऊनचा रंग चंदेरी असेल तर तो जिंकण्याचं प्रतीकही मानलं जातं.


साईशा भारतातील प्रसिद्ध डिझायनर्सपैकी एक आहे. हरनाजने मिस युनिव्हर्सचा ताज जिंकल्यानंतर सायशाने एक फोटो शेअर केला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिलंय की,  'हमने कर दिखाया...' तर पुढच्या कमेंटमध्ये तिने लिहिलंय की, ' मैं तुमसे मिलने के लिए बेचैन हूं'


पुरुष ते स्त्री बनली
आधी त्याचं नाव स्वप्नील शिंदे होतं. नंतर त्याचं लिंग त्याने बदललं, याची माहिती त्याने जानेवारीत दिली होती. ती आता ट्रान्सवुमन झाली आहे. त्याची पोस्ट चांगलीच व्हायरल झाली होती. त्याने लिहिलं होतं की,  'शेवटी मला धैर्य मिळालं आहे की, मी माझे सत्य स्वीकारू शकेन. मी समलिंगी असल्यामुळे मला पुरुषांबद्दल आकर्षण आहे हे मला काही वर्षांपूर्वीच समजलं. पण मी 6 वर्षांपूर्वी माझे सत्य स्वीकारले आणि आता मी समलिंगी नाही तर ट्रान्सवुमन आहे.




अनेक स्टार्सचे ड्रेस डिझाइन
सायशाने करीना कपूर, कतरिना कैफ, कियारा अडवाणी, दीपिका पदुकोण, अनुष्का शर्मा, हिना खान, सनी लिओन यांसारख्या अनेक स्टार्ससाठी ड्रेस डिझाइन केले आहेत. हरनाजचा संपूर्ण गाऊन पंजाबच्या 'फुलकारी'च्या खास कारागिरीने प्रेरित आहे. हरनाज ही पंजाबची आहे, त्यामुळे तिला देसी स्टाइलचा गाऊनही देण्यात आली आहे.