काबुल : अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) सुरू असलेल्या रक्तरंजित संघर्षादरम्यान तालिबानला (Taliban)  आतापर्यंतचे सर्वात मोठे यश मिळाले आहे. एएफपी या वृत्तसंस्थेच्या अहवालानुसार, तालिबानने शुक्रवारी कंधार (Kandahar) शहरावर कब्जा केला आहे. तालिबानने दावा केला की त्यांनी आणखी एक प्रांतीय राजधानी कंधार ताब्यात घेतली आहे. आता फक्त राष्ट्रीय राजधानी काबूल त्यांच्या ताब्यात येणे बाकी राहीली आहे. काबुलनंतर कंधार हे अफगाणिस्तानमधील दुसरे मोठे शहर आहे.


गझनी आणि हेरात भागावर ताबा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमेरिकन सैन्याने माघार घेतल्यापासून तालिबान (Taliban) पूर्ण ताकदीने सत्ता हस्तगत करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यानी आतापर्यंत अनेक भागांवर कब्जा केला आहे. गुरुवारी तालिबानने कंधार जिंकण्यापूर्वी आणखी दोन प्रांतीय राजधानी गझनी आणि हेरात भाग ताब्यात घेतला आहे. अशाप्रकारे, दहशतवादी संघटनेने आतापर्यंत 12 प्रांतीय राजधानी ताब्यात घेतल्या आहेत. आता त्याचे पुढील लक्ष्य राजधानी काबूल आहे.


राजधानीपासून फक्त 130 दूर


तालिबान लढाऊ काबूलपासून केवळ 130 किमी अंतरावर आहेत. अलीकडेच, अमेरिकेच्या एका गुप्तचर अहवालात म्हटले आहे की, तालिबान 1 महिन्याच्या आत काबुलला घेराव घालण्याची शक्यता असून 3 महिन्यांच्या आत राजधानी काबूल काबीज करू शकतात. त्याचवेळी, तालिबानने गझनीवर कब्जा केल्याने, काबूलला दक्षिणेकडील प्रांतांना जोडणारा एक महत्त्वाचा महामार्ग तोडून बंद गेला आहे. स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले की गझनी शहराबाहेरील लष्करी प्रतिष्ठान आणि गुप्तचर तळावर अजूनही तुरळक लढाई सुरू आहे.


तालिबानने या भागांवर केला कब्जा 


तालिबानी अतिरेक्यांनी आतापर्यंत झरंज, शेबरघन, सार-ए-पुल, कुंदुज, तलोकान, ऐबक, फराह, पुल-ए-खुमारी, बदाखशान, गझनी, हेरात आणि कंधारवर ताबा मिळवला आहे. लष्कर गाहमध्ये अजूनही जोरदार लढाई सुरू आहे. त्याचवेळी, तालिबानच्या झपाट्याने वाढत्या हालचाली पाहता, अफगाणिस्तान सरकारही कराराबाबत बोलत आहे. असे म्हटले जात आहे की, राष्ट्रपती सस्ता वाटण्याबाबत निर्णय घेऊ शकतात.


आपल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी अमेरिका पाठवणार सैनिक 


दुसरीकडे, अमेरिका काबूलमधील दूतावासातून आणखी काही जवानांना परत आणण्यासाठी अतिरिक्त सैन्य पाठवणार आहे. एका अधिकाऱ्याने याबाबत माहिती दिली. अधिकारी म्हणाले की, हे सैनिक अफगाणिस्तानातून अमेरिकन नागरिकांना परत येण्यास मदत करतील. पेंटागॉनचे प्रेस सेक्रेटरी जॉन किर्बी यांनी घोषणा केली की अमेरिकेचे संरक्षण विभाग काबूलमधून दूतावासाच्या कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यासाठी अफगाणिस्तानात सैन्य पाठवेल. ते म्हणाले की, पुढील 24-48 तासांमध्ये 3 बटालियन काबुल विमानतळावर हलविण्यात येणार आहे. यात सुमारे 3,000 सैनिक असतील.