Trending News : आपण खूप वेगाने प्रगती करत आहोत. नवीन संशोधन नवीन नवीन टेक्नॉलॉजी विकसित होतं आहे. अशातच एका कंपनीने दावा केला आहे की, भविष्यात बाळांना जन्म देण्यासाठी आता महिल्यांचा गर्भाशयाची गरज नाही. मुलं आता मशीन ( Artificial Womb Facility )  द्वारे जन्माला येऊ शकतो. 


कंपनीचा दावा की...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अॅक्टोलाइफ कंपनीच्या मते, 'आर्टिफिशियल गर्भाशय फॅसिलिटी' (Artificial Womb Facility ) टेक्नॉलॉजीद्वारे बाळाच्या जन्मासोबतच त्याचा डोळ्यांचा रंग त्याचा केसांचा रंग अगदी त्याची बुद्धिमत्ता या सगळ्या गोष्टी ठरविता येणार आहे. विश्वास बसतं नाही ना...पण भविष्यात हे होणार असल्याचा दावा अॅक्टोलाइफ कंपनीने केला आहे.(Trending Artificial Uterus Facility future you can decide the color of the baby hair and eyes Latest Marathi News) 



या संशोधनानुसार या मशीनद्वारे इच्छित मूल मिळू शकतं. एवढंच नाही तर मुलांचं जनुके बदलण्यासाठी CRISPR-Cas9 नावाचे जनुके वापरण्यात येणार आहे. या प्रक्रियेत बालकांचे 300 प्रकारचे DNA बदलले जातात. म्हणजेच, मशीनमध्ये जन्मलेल्या मुलांमध्ये विशेष जनुके टाकली जातात. या द्वारे तुम्ही तुमच्या आवडीचे मूल निर्माण करू शकता. 




Hashem Al-Ghaili कोण आहे? 


या संशोधनाचे जनक म्हणजे हाशेम अल-घैली...यांनी आपल्या सोशल मीडियावर या संशोधनाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी 'आर्टिफिशियल गर्भाशय फॅसिलिटी' ही टेक्नॉलॉजी बद्दल सखोल माहिती दिली आहे. 1950 पासून शास्त्रज्ञ आणि इंजीनिअरिंग या संकल्पनेवर एकत्र काम करत असल्याचा कंपनीचा दावा आहे.