Trending news in Marathi : आई वडील असो किंवा शिक्षक मुलांना चांगली सवय आणि शिस्त लागावी यासाठी जागृत असतात. पूर्वीच्या काळी मुलांना पाठीवर एक दोन धपाटे सहज मिळायचे. शिक्षकही शाळेत तुम्हाला छडीने मारायचे. पण जग बदललं, आता मुलांना शाळेत काय घरी पण मारत नाहीत. कारणही म्हणे मुलांच्या मनावर परिणाम होतो. त्यांच्या मानसिक आरोग्यावर या गोष्टींचा खोलवर परिणाम होतो. लहानपणीचे काही क्षण असे असतात जे कायम आपल्या स्मरणात असतात. काही क्षणाचे आघात मनाच्या कोपऱ्यावर त्यांचा खोलवर जखमा असतात. लहानपणीची अशीच एक घटनेचा परिणाम या अभिनेत्यावर झाला आणि त्याने बदला म्हणून कहर केला. 


...अन् त्याने शाळा विकत घेत त्यावर चालवले बुलडोझर


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या अभिनेत्याने त्याच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली. ज्यात तो एका सिमेंटच्या ढिगाऱ्याजवळ पोझ देत फोटो काढला आहे. हा फोटो शेअर करताना त्याने लिहिलं की, माझ्या प्राथमिक शाळेतील शिक्षक मला नेहमीच मारायचे. म्हणून हा राग मनात ठेवून मी आजही शाळा विकत घेतील आणि या शाळेच्या इमारतीवर बुलडोझर फिरवलं. पुढे तो असाही म्हणाला की, एका विशिष्ट मानसिक स्थितीत मी हे कृत्य केलंय असंही तो म्हणाला. 


काही वेळातच या अभिनेत्याची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली. एवढंच नाहीतर ही स्टोरी सध्या सोशल मीडियावर ट्रेंडिंगमध्ये आहे. या अभिनेत्याच्या कृत्यावर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. काही लोकांनी त्यावर सडकून टीका केलीय. तर काही नेटकऱ्यांनी त्याच्या कृत्याचं समर्थन केलंय.


एका यूजर्सने तर चक्क लिहिलंय की, 'तू माझं स्वप्न जगला आहे.' तर दुसरा युजर्स म्हणतोय की, 'मलाही माझ्या शाळेच्या बाबतीत असंच काहीस करायचं आहे.'



शाळा ही विद्येचं मंदिर आहे, त्यामुळे या अभिनेत्याचं हे कृत्य पाहून अनेकांना धक्का बसला आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात काही घटना अशा असतात ज्याचा परिणाम खोलवर होतो. पण त्यातून बाहेर पडणं गरजेचं आहे. पण क्रोधाची भावना आणि द्वेष मनातून ठेवून अशा प्रकारचे कृत्य हे अमान्य आहे. 


कोण आहे हा अभिनेता?


तुम्हाला प्रश्न पडला असेल कोण आहे हा अभिनेता आणि कुठली आहे ही घटना. तर एक तुर्की अभिनेता असून त्याचं नाव कॅगलर असं आहे. 2020 मध्ये अफिल आस्क यासाठी त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी गोल्डन बटरफ्लाय पुरस्कार देण्यात आलंय.