Trending News : एका शॉपिंग मॉलमध्ये खेळण्याच्या दुकानात छोट्या मुलाकडून नकळत घडलेली चूक वडिलांना चांगलीच महागात पडली. यासाठी वडिलांना तब्बल 3 लाख रुपये मोजावे लागले.  मुलाकडून झालेल्या नकळत चुकीसाठी इतका दंड केल्याबद्दल नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नेमकी घटना काय?
ही घटना चीनमधली आहे. इथल्या लँगहॅम प्लेस शॉपिंग मॉलमधल्या एका खेळण्याच्या दुकनात 5.9 फूट उंच मूर्ती ठेवण्यात आली होती. या मूर्तीचं वैशिष्टय म्हणजे या मूर्तीला सोन्याचा मुलामा देण्यात आला होता आणि या सोन्याच्या मूर्तीची किंमत जवळपास पाच लाख रुपये इतकी होती. ही मूर्ती ग्राहकांच्या आकर्षणाचा विषय होती. मूर्ती बघण्यासाठी दुकानात अनेक ग्राहकांची गर्दी करत असत.


एकेदिवशी या मूर्तीचे तुकडे जमिनीवर पडलेले दिसले आणि एकच खळबळ उडाली. ही मूर्ती कशी तुटली, कोणी तोडली? याबाबत चर्चा सुरु झाली. अखेर दुकान मालकाने दुकानातील सीसीटीव्ही तपासलं. तेव्हा एक छोटा मुलगा या मूर्तीला टेकून उभा असलेला दिसला. मुलाच्या धक्क्याने ती मूर्ती खाली पडली. त्या मुलाने मूर्ती खाली पडण्यापासून वाचवण्याचा प्रयत्न केला पण त्याला त्या मूर्तीचं वजन पेलवलं नाही. मूर्ती खाली पडून त्याचे तूकडे झाले. 



ही घटना घडली तेव्हा मुलाचे वडील चेंग हे दुकानाबाहेर फोनवर बोलत होते.  मूर्ती पडल्याचं पाहाताच मुलासह त्याचे वडिलही घाबरले आणि त्यांनी तिथून पोबारा केला. पण काही वेळाताच सीसीटीव्हीमुळे त्यांना पकडण्यात आलं. मुलाची चूक मान्य करत वडिलांनी पैसे देण्याती तयारी दर्शवली. मुर्तीची किंमत 5 लाख रुपये इतकी होती, पण दुकानादाराने डिस्काऊंट देत 3.3 लाख रुपये वसूल केले. 


पण या प्रकरणाची सोशल मीडियावर चर्चा रंगली आणि दोन गट पडले. छोट्या मुलाच्या चुकीची वडिलांना इतकी किंमत मोजावी लागल्याने काही लोकांनी दुकानदाराला दोषी ठरवलं. मूर्ती इतकी महाग होती तर त्या भोवती संरक्षणाची उपाययोजना का करण्याता आली नव्हती असा प्रश्न काही लोकांनी विचारला आहे. तर काही लोकांनी पालकांनी मुलाची काळजी घ्यायला हवी असं सांगत मुलाच्या वडिलांनाच दोषी ठरवलं.