Fire At Church In Egypt's Cairo's Kills 41: इजिप्तमधील कैरो येथील कॉप्टिक चर्चला रविवारी 14 ऑगस्टला भीषण आग लागली. या आगीत 41 जणांचा मृत्यू झाला असून 16 जण जखमी झाले आहेत. ही आग चर्चमधील एअर कंडिशनिंग युनिटमधून लागली, अशी माहिती इजिप्त गृह मंत्रालयाने दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING



चर्चमध्ये 5 हजार लोक प्रार्थनेसाठी असतानाच ही दुदैवी घटना घडली. या आगीत लहान मुलं, चर्चमधील धर्मगुरु आणि स्थानिकांचा मृत्यू झाला आहे. या आगीत लहान मुलांचा सर्वाधिक मृत्यू झाला आहे. आगीची बातमी मिळतात चर्चमध्ये धावपळ सुरु झाली. या धावपळीतून चर्चमध्ये चेंगराचेंगरी झाली यात अनेकांचे जीव गेले. तर काही लोकांचा गुदमरुन मृत्यू झाला. या भीषण आगीत चर्चचंही मोठं नुकसान झालं आहे.



इजिप्तमध्ये गेल्या काही वर्षात अनेक मोठ्या आगीच्या दुर्घटना घडल्या आहेत. या आगीत बळी पडलेल्यांना अखरेचा निरोप देण्यासाठी इजिप्तमधील असंख्य लोक उपस्थित होते. या आगीनंतर चर्चेमधील मन हेलावून टाकणारे फोटो समोर आले. कुठे शूज पडले आहेत तर लाकडी टेबल, खुर्च्यांसह अनेक फर्निचर जळून खाक झाले आहेत.