Ex Girlfriend समोर आणणार Elon Musk चं खरं रुप; प्रायव्हेट Photo ची एकच चर्चा
कारण असं की तुम्ही कल्पनाही केली नसेल.
Elon Musk Private Photos : टेस्लामुळं जगभरात नाव कमवलेल्या Elon Musk यांची चर्चा फक्त त्यांच्या बलाढ्य व्यावसायिक साम्राज्यामुळेट नव्हे, तर त्यांच्या खासही आयुष्यामुळेही प्रकाशझोतात असतात. बऱ्याच अभिनेत्री, मॉडेल्सशी मस्क यांचं नाव जोडलं गेलं आहे. त्यातच आता म्हणे त्यांच्या काही खासगीतील फोटोंचा लिलाव केला जात आहे.
Private Photo चा लिलाव? लक्षात येतंय का काही? मस्क यांची Ex Girlfriend Jennifer Gwynne त्यांचे काही फोटो लिलावात सर्वांसमोर आणत आहे. हे फोटो त्यांच्या महाविद्यालयीन दिवसांतील असल्याचं सांगण्यात आलं आहे.
Jennifer Gwynne शेअर करत असणारे हे फोटो त्या वेळचे आहेत जेव्हा ते दोघं University of Pennsylvania मध्ये शिक्षण घेत होते. त्यावेळी दोघांचंही वय फारच कमी होतं. त्यांचं हे नातं वर्षभरासाठी टिकलं होतं.
सध्या जेनिफरनं जवळपास 48 फोटो लिलावासाठी ठेवले असून, त्यामाध्यमातून ती सावत्र मुलाच्या शिक्षणाचा खर्च उचलणार आहे.
NASA नं जगासमोर आणला अंतराळाचा आवाज, 20 कोटी प्रकाशवर्षे दूर काय चाललंय ऐकून अंगावर काटा येईल
100 डॉलरपासून किंमत...
लिलावासाठी असणाऱ्या फोटोंमध्ये मस्क जेनिफरसोबत पोझ देताना, मित्रांसोबत धमाल करताना, स्वत:च्या खोलीत निवांत क्षणांचा अनुभव घेताना दिसत आहेत. त्यांचं हे कधीही न पाहिलेलं रुप सध्या जगासमोर आलं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार या फोटोंवर कमीत कमी 100 डॉलर रुपयांपासून बोली लावण्यात येणार आहे.
जेनिफरसोबत मस्क यांचं नातं तेव्हा पूर्णपणे तुटलं जेव्हा ते पालो ऑल्टोमध्ये गेले. तिथं त्यांनी जस्टिन विल्सनला डेट करणं सुरु केलं.