NASA नं जगासमोर आणला अंतराळाचा आवाज, 20 कोटी प्रकाशवर्षे दूर काय चाललंय ऐकून अंगावर काटा येईल

हा अदभूत व्हिडीओ हेडफोन लावूनच ऐका

Updated: Aug 24, 2022, 02:30 PM IST
NASA नं जगासमोर आणला अंतराळाचा आवाज, 20 कोटी प्रकाशवर्षे दूर काय चाललंय ऐकून अंगावर काटा येईल  title=
NASA shares video of Black Hole Sound

NASA Black Hole Sound : अंतराळ, आकाशगंगा, ग्रह, तारे, धुमकेतू हे सर्व शब्द ऐकल्यानंतर तुम्हाला शाळेचे दिवस आठवले असतील. म्हणजे आपल्यापासून मोजताही येणार नाही, इतक्या दूर असणाऱ्या अंतराळाविषयीचं कुतूहल हे काही ठराविक वयापुरता मर्यादित नाही. सध्या Nasa नं शेअर केलेला एक व्हिडीओ पाहून असंच म्हणावं लागेल. 

नासानं शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये जे काही कानांवर पडतंय ते ऐकून अंगावर काटा उभा राहतोय. कारण, हा आवाज आहे अंतराळाचा राक्षस म्हणून उल्लेख केल्या जाणाऱ्या ब्लॅक होलचा. 

अंतराळात असणाऱ्या पोकळीमुळं तिथं असणारे वायू जेव्हा एकमेकांवर आदळतात तेव्हा नेमका कोणता आवाज होतं हे नासानं जगाला ऐकवलं आहे. एखाद्या भयपटामध्ये जेव्हा भीती वाढवण्यासाठी ज्या आवाजाचा वापर केला जातो तसाच काहीसा हा आवाज आपल्या कानांवर पडत आहे. 

Nasa नं दिलेल्या माहितीनुसार हा ब्लॅक होल पर्सियस गॅलेक्सी क्लस्टर (Perseus Galaxy Cluster) मध्ये आहे. जिथं गरम वायूचे अनेक पुंजके आहेत. इथं हा आवाज रेकॉर्ड करणं शक्य झालं कारण तिथं कोत्याही प्रकारच्या कंपनाचा व्यत्यय नव्हता.