मुलीसोबत लग्न करण्यासाठी त्याने पत्नीला विष दिलं, आईचा जीव घेण्यासाठी लेकीनेही...
एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुलीसोबत लग्न करण्यासाठी त्याने पत्नीला विष देऊ मारण्याचा प्रयत्न केला. या कटात मुलगीही सहभागी होती, असं त्याच म्हणं आहे.
एक विचित्र आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीला मुलीशी लग्न करायच होतं. पण या लग्नात पत्नी अडथळा होती. म्हणून त्यांचा प्रेमातील अडथळा निर्माण करणाऱ्या पत्नीला त्याने कोकोकोलातून विष देऊन मारण्याचा प्रयत्न केला. (trending news husband poisoned his wife to marry his daughter Father marriage Viral News )
अमेरिकेतील इंडियानामधील ही धक्कादायक घटना समोर आली आहे. 71 वर्षीय आल्फ्रेड डब्ल्यू रूफ याला वेन काउंटी कोर्टात आपल्या पत्नीला मारण्याचा आणि आपल्या मुलीशी लग्न करण्याचा कट रचल्याबद्दल दोषी ठरवलंय. या कृत्याबद्दल त्याला पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
रूफ विरुद्धचा 2021 मधील घटनांच्या मालिकेचे सत्य समोर आलंय. जेव्हा त्याच्या पत्नीला अनेक वेळा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि तिथल्या डॉक्टरांनी तपासातून धक्कादायक खुलासा केला. फॉक्स न्यूजच्या वृत्तानुसार, रूफने कथितरित्या पोलिसांकडे कबूल केलं की त्याने पत्नीला मारण्यासाठी आणि तिच्या मुलीशी लग्न करण्याच्या प्रयत्नात पत्नीला वारंवार विष पाजले होते.
रूफच्या पत्नीने जानेवारी 2022 मध्ये पोलिसांशी संपर्क साधला जेव्हा त्याने कथितपणे तिला विष देण्याचा प्रयत्न केल्याची कबुली दिली. पीडित महिलेने सांगितलं की अलिकडच्या आठवड्यात तिला सहा वेळा डोकेदुखी, तंद्री आणि अतिसार या लक्षणांसह रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. हॉस्पिटलमध्ये, तिने MDMA, कोकेन आणि बेंझोडायझेपाइन्ससाठी सकारात्मक चाचणी केल्या. त्यात तिने आपण यापैकी कोणत्याही पदार्थाचा वापर केला नसल्याचा स्पष्टपणे नकार दिला.
त्याचवेळी पोलीस तपासासाठी रूफ यांच्या घरी पोहोचले असता त्यांना पांढरी पावडर सारखी पदार्थ आणि कोकाकोलाचा कॅनही आढळून आला. ज्याची चाचणी केल्यानंतर या महिलेला कोकाकोलामध्ये विषबाधा झाल्याचे आढळून आलं.
मुलीनेही कटात सहभागी
रुफने दावा केलाय की, त्याच्या पत्नीच्या मुलीने म्हणजे सावत्र मुलीने त्याला पावडर दिली होती आणि त्याला पत्नीच्या पेयात मिसळण्यास सांगितलं होतं. रूफने मुलीशी लैंगिक संबंध असल्याचंही कबूल केलं, ज्याने कथितपणे तिला जीवन विमा पॉलिसी मिळविण्यासाठी पत्नीला ठार मारण्याचा सल्ला दिला आणि नंतर रूफशी लग्न केलं.
आपल्या पत्नीला मारणे हे रूफचे अंतिम ध्येय
रूफने सांगितलं की, सप्टेंबर ते डिसेंबर 2021 पर्यंत त्याने आपल्या पत्नीच्या पेयात सुमारे 12 वेळा विष दिलं. न्यायालयाच्या कागदपत्रांनुसार, रूफ म्हणाले की, त्याला माहित होते की विष शेवटी आपल्या पत्नीला मारेल आणि हेच त्याचे अंतिम ध्येय आहे.