Trending News In Marathi: एका तरुणीला तिच्या घराच्या खाली एक सीक्रेट गुहा सापडली आहे. जवळपास 200 वर्ष प्राचीन गुहा पाहून तरुणीचा मोठा धक्का बसला आहे. घराचे काम सुरु असतानाच काही मजुरांच्या नजरेस ही गुहा पडली तेव्हाच या घटनेचा खुलासा झाला आहे. तरुणीच्या घराखाली सापडलेली गुहा ही 1800 दशकातील असू शकते, असा दावा करण्यात येत आहे.


घरात सापडली सिक्रेट गुहा 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ब्रिटनमधील नॉटिंगममधील हे प्रकरण आहे. तरुणीने घराखाली सापडलेल्या गुहेबाबत तिच्या मित्रांना व शिक्षकांना माहिती दिली. त्यानंतर सर्वएकत्र गुहेच्या आत नेमकं काय दडलंय याचा शोध घेण्यासाठी गेले होते. त्यावेळेस गुहेचा वापर प्राचीन काळी घरातील सामान साठवण्यासाठी केला जात अशावा, अशी शक्यता त्यांनी वर्तवली आहे. 


घरात काम करताना मजुरांनी शोधली गुहा


द सनने दिलेल्या वृत्तानुसार, घरात इमरजन्सी लाइट लावण्याचे काम सुरु असताना मजुरांना या गुहेबाबत माहिती मिळाली. तेव्हा त्यांनी घराच्या मालकांना याबाबत सांगितले. तरुणीने तिच्या मित्रांसह गुहेत जाण्यास तयार झाली. त्यावेळी गुहेतील जमिनीवर एक पूर्ण मजला तयार केला गेलेला दिसला. तर, गुहेतील चार भिंतीमध्ये सामान ठेवण्यासाठी बेंच कापलेले दिसलेले. या बेंचवर अन्न व पेय साठवण्यासाठी त्याचा वापर केला जात असावा. 


तरुणीने दिली माहिती


स्टेफनी बेनेट ही तरुणी अलीकडेच या घरात शिफ्ट झाली आहे. त्यामुळं या घरात सापडलेल्या गुहेमुळं भीतीचे वातावरण आहे. तिने दिलेल्या माहितीनुसार, ही गुहा 6 फुट लांब आणि 4 फूट रुंद आहे. पण तरीही आम्ही सगळेजण एकत्रच गुहेच्या आत गेलो होतो. कारण आम्ही पहिल्यांदाच असं काही वेगळं करत होतो. 


पुरात्तवविभागाच्या अधिकाऱ्यांकडून पाहणी


स्टेफनी हिने स्थानिक पुरातत्वविभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी या गुहेची पाहणी केल्यानंतर जवळपास दोन दशकांपूर्वी या गुहेची बांधणी केली असावी, असा त्यांचा प्राथमिक अंदाज आहे. ही गुहा एका घरातील तळघरासारखी आहे. 19व्या शतकातील असून शकते, असं पुरातत्वविभागाने म्हटलं आहे.