Crime News In Marathi: हत्येचा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्या व्यक्तीला एकतर जन्मठेप किंवा फाशीची शिक्षा दिली जाते. गुन्हा सिद्ध झाल्यावर तर या शिक्षेची अंमलबजावणी केली जाते. जगात अशा अनेक क्रुर घटना घडल्या आहेत. या गुन्ह्यांसाठी दिलेली शिक्षादेखील कमी पडते. अलीकडेच एक भयंकर घटना समोर आली आहे. एका तरुणीने तिच्या प्रियकराचा निर्घृणपणे खून केला. मात्र तरीही ती कायद्याच्या कचाट्यातून सुटली आहे. 33 वर्षांच्या या Bryn Spejcher चे हे प्रकरण ऐकून अंगावर शहारे येतील. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ब्रायनने 2018 साली तिचा प्रियकर ओमेलियाचा 108 वेळा चाकू भोसकून हत्या केली होती. ही घटना जेव्हा घडली तेव्हा ती मरिजुआना या ड्रग्सच्या नशेत होते. मात्र, धक्कादायक म्हणजे हत्येचा आरोप सिद्ध झाल्यानंतरही तिची शिक्षा रद्द करण्यात आली आणि तिची सुटका करण्यात आली. 


कोर्टात सर्व आरोप सिद्ध झाल्यानंतरही ब्राइनला चार वर्षांच्या निलंबित तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आल्याने ओ'मेलियाच्या कुटुंबाला धक्का बसला. तिला प्रोबेशनवर ठेवण्यात आले तसंच, 100 तासांची सामुदायिक सेवा करण्यास सांगितले. तसंच, मारिजुआना ड्रगमुळं होणाऱ्या मानसिक विकारांबद्दल जागरुकता निर्माण करण्यास तिला सांगण्यात आले. निलंबित शिक्षा म्हणजे  आरोपी दोषी असूनही त्याला तुरुंगाबाहेर राहता येऊ शकते. 


एका वृत्तसंस्थेनुसार, डिसेंबर 2023मध्ये तिला दोषी सिद्ध करण्यात आले होते. मात्र, शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर तिच्या प्रियकराच्या कुटुंबीयांनी त्यावर विरोध दर्शवला. मात्र, शिक्षा सुनावताना न्यायाधीशांनी शिक्षा सुनावण्यापूर्वीचे त्यांचे लॉजिक सगळ्यांना समजावून सांगितले. ज्या दिवशी घटना घडली तेव्हा घटनास्थळी असलेल्या औषधांचा प्रभाव तिच्यावर इतका होता की त्यामुळं ब्रायन मानसिक स्थिती खालवली होती. तिच्यावर तिचे नियंत्रण नव्हते. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने तिच्या प्रियकरावर चाकुने हल्ला केल्यानंतर स्वतःलाही इजा पोहचवण्याचा प्रयत्न केला. ती वेड्यासारखी ओरडत होती आणि शेवटी तिच्या मानेवर चाकूने वार केले. मात्र, योग्य वेळी पोलिस आल्यामुळं तिचा जीव वाचला आणि त्यांनी तिला रुग्णालयात दाखल केले. ब्रायनला शिक्षा सुनावल्यानंतर ब्राइन तिच्या प्रियकरांच्या घरच्यांकडे पाहून खूप जास्त रडत होती. 


ब्रायनने त्यांना पाहून म्हटलं की, मी तुमच्या कुटुंबाला तोडलं आहे. मी आतून पूर्णपणे तुटून गेले आहे. मी खूप दुखी आहे. मला दुख आहे की तुम्ही चाडला पुन्हा कधी पाहू शकत नाही.