Trending Video : वाढदिवस..! हा प्रत्येकाच्या आयुष्यातील सर्वात खास दिवस असतो. तो दिवस अतिशय सुंदर आणि सरप्राइजने भरलेला असावा असं प्रत्येकाला वाटतं. या दिवशी खास केक, गिफ्ट आणि बर्थडे पार्टी मजे धम्माल...कुटुंबातील सदस्य आणि मित्र परिवार आपल्या या बर्थ डे बॉय किंवा गर्लसाठी सगळं कसं स्पेशल करतात. हा दिवस त्या व्यक्तीसाठी कायम लक्षात राहावा असा साजरा करण्याचा प्रयत्न घरचे किंवा प्रियजन करत असतात. (trending news little boy never celebrated his birthday than teachers and classmates gets surprise lovely video viral  now)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण या जगात असेही काही व्यक्ती आहेत ज्यांचा वाढदिवस हा इतर दिवसांसारखाच एक दिवस असतो. ना त्यांना कोणी शुभेच्छा देतात, ना त्यांच्यासाठी कोणी केक आणतं. मग अशाच पार्टी आणि सरप्राइज दूरचीच गोष्ट...


सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये एका शालेय मुलाचा डोळ्यात पाणी आहे. कारण त्याचा टिचर आणि वर्ग मित्रांनी त्याच्या वाढदिवसासाठी सरप्राइज त्याला दिलं होतं. तुम्हाला जाणून आश्चर्य होईल की, या चिमुकल्याचा आयुष्यात कधीही वाढदिवस झाला नव्हता. त्यामुळे त्याच्यासाठी हा क्षण आयुष्यातील सर्वात अनमोल क्षण आणि अस्मरणीय दिवस ठरला. 


 त्या चिमुकलाला माहिती नव्हतं आज त्याचा आयुष्यात काय होणार आहे. नेहमी प्रमाणे तो उठला आणि शाळेत आला. वर्गात पोहोचला आणि त्याला आयुष्यातील सर्वात सुंदर गिफ्ट मिळालं. मित्राचा वाढदिवस मग त्याचा वर्गमित्रांमध्ये कमालीचा उत्साह दिसून येत होता. ते त्याच्यासाठी हॅप्पी बर्थ डे गाणं गात होते. घरातील एक कोपऱ्यात छान वाढदिवसाची सजावट केली. 


हे सगळं पाहून त्याच्या डोळ्यात अश्रू आले. तो आनंदाने न्हावून निघाला. प्रत्येकाला त्याला मिठी मारून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. 


हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील इन्स्टाग्रामच्या naughtyworld या अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला. त्यानंतर आतापर्यंत या व्हिडीओला 1 लाखांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत. हा व्हिडीओ पाहून प्रत्येक जण भावूक होत आहेत.



आयुष्यात कधी कधी छोट्या छोट्या गोष्टी खूप मोठा आनंद देऊन जातो. त्यामुळे तुम्हालाही अशी संधी मिळाली तर कोणासाठी काही तरी नक्की करा. त्या व्यक्तीला तर आनंद होतोच पण कोणासाठी आपण काही तरी केलं याचा आनंद तुम्हाला पूर्ण करुन जातो.