एक महिना मोबाईलपासन दूर राहा, 8 लाख रुपये कमवा... `या` कंपनीची जबरदस्त ऑफर
Viral News : अन्न, पाणी आणि निवाराबरोबरच आता मोबाईल हा माणसाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनलाय. दिवसातले आठ ते नऊ तास आपण मोबाईलमध्य वेळ घालवतोय. तरुणपिढीला तर मोबाईलचं व्यसनच लागलं आहे. या पार्श्वभूमीवर एक कंपनीने लखपती बनण्याची ऑफर दिली आहे.
Viral News : मोबाईलमुळे आपला स्क्रिन टाईम प्रचंड वाढला आहे. सध्याच्या काळात मोबाईलची गरज आहे. पण त्याचा अतिरेक होऊ लागला आहे. कामाव्यतिरिक्तही मोबाईल पाहण्यात आपण तासनतास वेळ घालवू लागलो आहे. यातही तरुण पिढीला तर मोबाईलचं व्यसनच लागलं आहे. आभासी जगामुळे आपण वास्तव्यातील जगापासून दूरावतोय. मोबाईलचं व्यसन कमी करण्यासाठी एका कंपनीने जबरदस्त ऑफर दिली आहे. एक महिना मोबाईलपासून पूर्ण दूर राहिल्यास ही कंपनी तुम्हाला 10,000 डॉलर म्हणजे तब्बल 8 लाख रुपये देणार आहे.
गेल्या काही दिवसात Dry January असा ट्रेंड सुरु होता. म्हणजे संपूर्ण जानेवारी महिन्यात दारू प्यायची नाही. तसाच आता Digital Detox Program ट्रेंड होतोय. काही जण याला डिजिटल डिटॉक्सही म्हणतायत. आईसलँडची योगर्ट कंपनी Siggi's ने ही ऑफर आणली आहे. यात दहा लोकांची निवड केली जाणार असून त्यांना एक बॉक्स दिला जाणार आहे. या बॉक्समध्ये आपला स्मार्टफोन बंद करुन ठेवायचा. त्यानंतर आयुष्याचा खरा आनंद लुटायचा असं या कंपनीची थीम आहे.
एक महिना मोबाईल बंद
एक महिना मोबाईलपासून दूर राहिल्यास Siggi's कंपनी विजेत्यांना आठ लाख रुपये देणार आहे. यासोबत तीन महिन्यांचा सिगी योगर्टचा डब्बा मोपत मिळणार आहे. सामान्य माणूस दररोज 4-5 स्मार्टफोनवर वेळ घालवतो. त्यामुळे मोबाईचं व्यसन सोडवण्यासाठी आम्ही लोकांना चॅलेंज दिल्याचं कंपनीचं म्हणणं आहे.
डिजिटल डिटॉक्स प्रोग्रॅम काय आहे?
31 जानेवारीपर्यंत Siggi's च्या बेवसाईटवर जाऊन 'डिजिटल डिटॉक्स प्रोग्रॅम'साठी नाव नोंदवता येणार आहे. आवश्यक माहिती दिल्यानंर तुम्हाला चॅलेंज दिलं जाईल. नशिबाची साथ असेल तर 8 लाख रुपयांचे मानकरी होण्याची तुम्हालाही संधी मिळेल.
स्मार्टफोन झोम्बी
मोबाईलच्या अतिवापराची समस्या मांडण्यासाठी बंगळुरुमध्ये (Bengaluru) एक पोस्टर लावण्यात आलं आहे. या पोस्टरने लोकांचं लक्ष वेधून घेतलं असून सोशल मीडियावरही हे पोस्टर व्हायरल झालं आहे. या पोस्टरमध्ये स्मार्टफोनच्या अतिवापराचे धोके सांगण्यात आलं आहे. या पोस्टरवर 'स्मार्टफोन झोम्बी'पासून सावधान अशी उपहासात्मक सूचना करण्यात आली आहे. वास्तविक या पोस्टरच्या माध्यमातून जागरुकता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मोबाईलमधून लक्ष काढून आजूबाजूलाही पाहा असा संदेश यातून देण्यात आला आहे.