Trending News : आपण कोणत्याही गोष्टीची माहिती हवी असेल तर आपण गुगल (Google) सर्च इंजिनचा वापर करतो. गावापासून परेदशापर्यंत आणि पृथ्वीपासून अंतराळापर्यंत प्रत्येक गोष्टीची इत्यंभूत माहिती आपल्याला गुगलवर सहजरित्या उपलब्ध होते. काहीवेळा जगाच्या कानाकोपऱ्यातून समान गोष्टीचा शोध गुगलवर घेतला जातो. वर्षाच्या शेवटी गुगलकडून सर्वात जास्त सर्च केलेल्या गोष्टींची यादी जाहीर केली जाते. डिसेंबर 2021 मधली यादी गुगलने जाहीर केली आहे. यात गूगलवर सर्वात जास्त सर्च करण्यात आलं ते म्हणजे पॉर्न स्टार मार्टिनी (Porn Star Martini).


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोण आहे पॉर्न स्टार मार्टिनी?
आता तुम्ही विचार करत असाल पॉर्न स्टार मार्टिनी कोण आहे? ती एखाद्या अॅडल्ट फिल्ममध्ये काम करणारी अभिनेत्री आहे का? पण तुम्ही जो विचार करताय, तसं बिल्कूल नाही. खरंतर पॉर्न स्टार मार्टिनी हा एक पेय पदार्थ आहे. लॉकडाऊन काळात जगभरात पॉर्न स्टार मार्टिनीची रेसिपी मोठ्या प्रमाणात सर्च करण्यात आली. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जगभरात लॉकडाऊन लावण्यात आला. या काळात लोकं घरातच कैद होती. अशात लोकांनी घरात बसून विविध प्रकारच्या खाण्याचे पदार्थ बनवले. अनेक पदार्थांच्या रेसिपी गुगलवर शोधण्यात आले. आणि यात सर्वात अग्रेसर होती पॉर्न स्टार मार्टिनीच रेसिपी.


नावावर लोकांचा आक्षेप
वास्तवित पॉर्न स्टार मार्टिनी एक क्लासिक फ्रूट कॉकटेल आहे. सर्वाधिक सर्च केल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांच्या यादीत हे कॉकटेल सहाव्या स्थानावर आहे. हे फ्रूट कॉकटेल त्याच्या नावामुळे जास्त चर्चेत आहे. पॉर्न स्टार मार्टिनी या नावावर अनेकांनी आक्षेपही घेतला आहे. 


आणखी कोणते पदार्थ शोधले गेले?
2021  म्हणजे लॉकडाऊनच्या काळात मशरुमच्या रेसिपी सर्वात जास्त सर्च केल्या गेल्या. 2021 च्या टॉप सर्च फूड आयटममध्ये मशरुम अव्वल स्थानावरआहे. याशिवाय मोदक बनवण्याची रेसिपीही लोकांनी खूप पाहिली. तसंच मटर मलाई, चिकन सूप आणि पालक सूप या रेसिपीही गुगलवर मोठ्या प्रमाणावर सर्च केल्या गेल्या आहेत.