Trending News : सोशल मीडियावर एका अवघ्या 10 वर्षांच्या चिमुकलीच्या लग्नाचे फोटो व्हायरल होत आहे. हा तर बालविवाह आहे असं तुम्ही म्हणाल, तर कोणाला वाटेल की हा कुठल्या विचित्र प्रथेचा भाग असेल. पण असं काही नाही आहे. कुटुंबाच्या समंतीने या चिमुकलीने आपल्या बॉयफ्रेंडसोबत लग्न केलं आहे. मुली जेव्हा समजूतदार होतात तेव्हापासून त्या आपल्या लग्नाचे स्वप्न रंगवत असतात. तसे स्वप्न या चिमुकलीने रंगवले होते. (Trending News ten year old girl married with boyfriend before dying leukemia in us viral news on Social media)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या चिमुकलीचा जीव शाळेतील एका मुलावर जडला. त्यानेही आपल्या प्रेमाची कबुली दिली. एक दिवस शाळेत त्या मुलाने तिच्याशी लग्न करायचा प्रयत्न केला. पण शिक्षकाने असं करण्यास विरोध केला. पण काही दिवसांनी 29 जून एका मोठा समारंभात दोन्ही कुटुंबायांच्या समंतीने या दोघांचं लग्न लावून दिलं. आता तुम्ही म्हणाल हा काय मुर्खपणा आहे. 


पण झालं असं की, या चिमुकलीचं नाव एम्मा एडवर्ड्स असं आहे. तर तिच्या बॉयफ्रेंडचा नाव डॅनियम मार्शल. हे दोघे अमेरिकेतील कॅलिफोर्नियाच्या क्रिस्टोफर शाळेचे विद्यार्थी आहेत. 


न्यूयॉर्क पोस्टच्यानुसार, एम्माला एप्रिल 2022 मध्ये लिमफोब्लास्टिक ल्युकेमिया या गंभीर प्राणघातक रोगाचं निदान झालं. एम्माचे पालक एलेना आणि अॅरॉन एडवर्ड्स ला खूप आशा होती की त्यांची मुलगी कर्करोगावर मात करेल. कारण मुलांमध्ये हा कर्करोगाचा सर्वात सामान्य प्रकार असून त्याचे उपचारदेखील शक्य असल्याने त्यांना वाटलं आपली लेक या रोगावर विजय मिळवेल. 


पण जूनमध्ये एम्माच्या पालकांवर आभाळ कोसळलं जेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की, कर्करोगावर ती मात करु शकणार नाही. तिच्याकडे जगण्यासाठी फक्त काहीच दिवस शिल्लक आहेत. आता आपल्या हातात काही उरलं नाही. 


यानंतर या काही दिवसांच्या आयुष्यात तिला सर्व सुख मिळावं म्हणून आई वडिलांची धडपड सुरु झाली. एम्मा लहानपणापासून लग्नाचं स्वप्न पाहत होती. शिवाय तिला शाळेतील एक मुलगा आवडत देखील होता. म्हणून दोन्ही घरातील पालकांनी तिचं हे स्वप्न पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. 


अलिना आणि डॅनियलच्या आईने त्यांच्या मुलांचं मॉक वेडिंग करण्याचा निर्णय घेतला. या लग्नाविषयी सांगताना अलिना म्हणाली की, या लग्नाची तयारी आम्हाला जलद गतीने करावी लागली. दोन दिवसांमध्ये आम्ही तयारी केली. या लग्नासाठी सगळ्या गोष्टी या आम्हाला डोनेशनमध्ये मिळाल्या. या सर्व गोष्टी खूप सुंदर आणि महाग होत्या. 


या लग्नासाठी आमच्या एका फ्रेंडने मदत केली. त्याने बाइबल वाचून हे लग्न लावून दिलं. या सोहळ्यासाठी 100 हून अधिक वऱ्हाडी आले होते. या जगावेगळ्या लग्नाने सर्वांचं लक्ष वेधलं. अलिना तिच्या जावयाबद्दल म्हणाली की, डीजे सर्वात चांगला मुलगा आहे. आम्ही त्याला यापूर्वी कधी भेटलो नव्हतो. त्यांचं हृदय सोन्याचं आहे आणि तो एम्मावर खरोखर मनापासून प्रेम करतो. 



धक्कादायक म्हणजे लग्नाच्या अवघ्या 12 दिवसांतच एम्माचा ल्युकेमियामुळे तिने जगाचा निरोप घेतला. हृदयावर दगड ठेवून त्यांनी आपल्या लाडक्या लेकीला शेवटचा निरोप दिला. दरम्यान 
23 DERECE या अकाऊंटवर या लग्नाचे फोटो पोस्ट करण्यात आले आहे.